शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजावर

By admin | Updated: April 6, 2017 02:04 IST

नाशिक : शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला.

नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीचे तुकडे होत असून जागतिक हवामान बदलामुळे शेती अनेक समस्यांच्या विळ्ख्यात सापडल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतीतील नुकसानीमुळे अन्नदाता बळीराजा कोलमडून पडण्याआधीच त्याला आधार देण्याची गरज असून, शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिर येथे बुधवारी (दि. ५) आयोजित सोहळ्यात ‘गिरणा गौरव पुरस्कार २०१७’ चे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, समीरन वाळवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेती आणि शेतकरी जगविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे माध्यमांनीही कृषी क्षेत्राला वाहिलेले सदर, वृत्तपत्रांसोबतच, राज्यस्तरावर मराठी भाषिक कृषी वाहिनी सुरू करण्याची गरज व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी आनंद अ‍ॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून समर्थन दिले. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी ‘राज्य म्हणे जनतेचे’ आणि ‘आई’ कविता सादर केली. दरम्यान, अहिरे यांच्या ‘बांधावरचा उद्योजक’ या पुस्तकाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या ‘वाटचाल’ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक वैशाली अहिरे यांनी, तर सूत्रसंचालन किशोरी केनीकर यांनी केले.