शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

महिलांचा आदर राखा

By admin | Updated: March 9, 2017 01:55 IST

नाशिक : सोनेनाणे, दागदागिने, कपडालत्ता याहीपेक्षा महिलांना आज सर्वाधिक आदराची गरज आहे. दुर्दैवाने या साऱ्या गोष्टी अधिक मिळतात पण आदर मिळत नाही

 नाशिक : सोनेनाणे, दागदागिने, कपडालत्ता याहीपेक्षा महिलांना आज सर्वाधिक आदराची गरज आहे. दुर्दैवाने या साऱ्या गोष्टी अधिक मिळतात पण आदर मिळत नाही. महिलांना त्या करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींचे कौतुक अपेक्षित असते, दखल घेणे अपेक्षित असते, असे मत सनदी लेखापाल, वास्तुविशारद, विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, अ‍ॅडव्होकेट, डॉक्टर, स्पेस एज्युकेटर, पोलीस उपनिरीक्षक, उद्योजक, आयकर आयुक्त यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.‘लोकमत’ आणि ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया, नाशिक शाखा’ यांच्या वतीने झालेल्या या राउंड टेबलमध्ये कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाचा ताळमेळ, वाढते घटस्फोट, महिलांचे समाजातील स्थान, महिलांसाठी करिअरच्या नवनव्या संधी या विविध विषयांवर विविध प्रकारची मते व्यक्त झाली. वास्तुविशारद सारख्या क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी केलेल्या कामाचा अभ्यास केला जातो. ताणतणावावर मात करत पुढे जाणे महत्त्वाचे असल्याचे मत वास्तुविशारद रुपाली जायखेडकर यांनी व्यक्त केले. विशिष्ट कामे महिलांनीच करावी, असे गृहीत न धरता सर्व कामांची जबाबदारी घरातील प्रत्येक सदस्याची असेल असे नियोजन करावे, आपल्या घराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी सांघिकतेने कामे करावीत, असे मत डॉ. चारुता बापये यांनी व्यक्त केले. मुला-मुलींवर केलेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. त्यांना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगितल्यास ते घटस्फोटापर्यंत येणार नाहीत, असे मत सनदी लेखापाल अर्चना जांगडा यांनी व्यक्त केले.मातांनी आपल्या मुलांना महिलांप्रती आदराने वागण्याची शिकवण देणे गरजेचे असून महिलांबाबतीत ते संवेदनशील असल्यास तिच्याही सुख-दु:खात समरस होऊ शकतील, असे मत सनदी लेखापाल मधुरा ठक्कर यांनी व्यक्त केले. नोकरी-व्यवसायाप्रमाणेच घरही महत्त्वाचे आहे याचे भान महिलांनी ठेवल्यास घटस्फोटापर्यंत वेळ जाणार नाही. घर-नोकरी दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करावा, असे मत सोनाली चांडक यांनी व्यक्त केले. हल्लीची मुलं-मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करत असून कुठे, कोणाशी कसे वागावे याचे त्यांना भान उरलेले नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तणुकीचा मागोवा घ्यावा, असे मत विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. लग्न करण्यापूर्वीच मुला-मुलींचे समुपदेशन करून द्यावे व त्यांना येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यावी, असे मत मेहता पेट्रोलपंपच्या संचालिका शर्मिला मेहता यांनी व्यक्त केले. चुकीच्या पद्धतीने शिकविल्या जाणाऱ्या स्त्रीत्वाच्या संकल्पनेवर नव्याने काम करण्याची वेळ आली असून, वाढत्या घटस्फोटांचा समाजाने गांभिर्याने विचार करावा, असे मत अ‍ॅड. राजश्री बालाजीवाले यांनी व्यक्त केले. महिलेच्या प्रगतीत कुटुंबाचा पाठिंबा, सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते, असे मत स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी व्यक्त केले. हल्लीच्या तरुणाईमध्ये सहनशक्ती राहिली नसल्याने आणि नकार पचवायची सवयच नसल्याने घटस्फोटांबरोबरच आत्महत्त्या, ताणतणाव, मानसिक-शारीरिक आजार यांचेही प्रमाण वाढले असल्याचे मत प्रा. सोनाली चिंधडे यांनी व्यक्त केले. हल्लीची पिढी निरनिराळ्या क्षेत्रात भराऱ्या घेत असली तरी त्यांच्यामध्ये दृढनिश्चयाचा अभाव दिसतो. भविष्यात काय करायचे आहे याचे पालक आणि पाल्य दोघांकडेही चित्र स्पष्ट असायला हवे, असे मत सनदी लेखापाल रेखा पटवर्धन यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)