शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ठराव घुसविण्याचा डाव फसला

By admin | Updated: April 26, 2017 01:19 IST

राज्य मार्ग हस्तांतरण : दारू दुकाने वाचविण्याचा आटापिटा सुरूच

नाशिक : शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्य विक्रीची दुकाने वाचविण्यासाठी मद्यविक्रेत्यांच्या लॉबीची आटापिटा सुरूच असून, सदर रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासंबंधीचा ठराव जादा विषयाच्या माध्यमातून मागील दाराने घुसविण्याचा डाव उघडकीस आला आहे. दुर्दैवाने, ठरावांवर स्वाक्षरी करणाऱ्या नगरसेवकांनीच प्रकरण अंगाशी येईल म्हणून हात वर केल्याने सदर डाव फसला आहे. विशेष म्हणजे ज्या शिवसेनेने राज्य मार्ग हस्तांतरणास विरोध दर्शविला आहे, त्याच पक्षात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकाकडून हा सारा उपद्व्याप सुरू असल्याचे समजते.राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने १ एप्रिल २००७ पासून बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत परंतु न्यायालयाच्या या आदेशाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मद्यविक्रेत्यांच्या लॉबीने नाना तऱ्हेचे प्रयत्न चालविले आहेत. शहरातून जाणारे पाच प्रकारचे राज्यमार्ग हे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासंबंधी आटापिटा सुरूच आहे. या प्रयत्नांना शासनातीलच सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही अप्रत्यक्षरीत्या साथही मिळताना दिसून येत आहे. महापालिका हद्दीतून जाणारे राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून अवर्गीकृत (डिनोटिफाइड) करावे यासाठी नाशिक महापालिकेनेही शासनाला ठराव पाठवावा यासाठी महासभेत जादा विषयांच्या माध्यमातून प्रस्ताव घुसविण्याचा डाव उघडकीस आला आहे. १५ एप्रिलला झालेल्या महासभेत सदर प्रस्ताव आणण्याच्या हालचाली करण्यात आल्या. त्यासाठी पंचवटीतील एका भाजपा नगरसेवकाच्या स्वाक्षरीनिशी प्रस्ताव तयार करण्यात आला, परंतु हा प्रकार आपल्या अंगाशी येऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर सदर नगरसेवकाने त्यास नकार दर्शविला. त्यानंतर सातपूर येथील विरोधी पक्षातील एका नगरसेवकाच्या स्वाक्षरीचा ठराव करण्यात येऊन तो घुसविण्याचा प्रयत्न झाला परंतु सदर नगरसेवकानेही त्याबाबत हात वर केले. त्यामुळे दि. १५ एप्रिल रोजी झालेल्या महासभेत जादा विषयाच्या माध्यमातून सदर प्रस्ताव येऊ शकला नाही. हा डाव फसल्यानंतर मागील पंचवार्षिक काळात झालेल्या शेवटच्या महासभेत मागील दारानेही ठराव घुसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील पंचवार्षिक काळात एका नगरसेवकाने नामकरणाचे आठ ते दहा प्रस्ताव दिले होते. त्यातील दोन ठराव एक करून त्यामध्ये हस्तांतरणाचा प्रस्ताव मागील तारीख टाकून मंजूर करण्याचाही डाव आखला गेला परंतु प्रशासनानेही त्यास नकार दिल्याने संबंधिताचा डाव तेथेही फसला. आता १९९२ साली तत्कालीन आयुक्तांनी मार्ग हस्तांतरणासंबंधीचा ठराव महासभेकडे पाठविला असल्याची माहिती मिळाल्याने त्या फाइलीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.