शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारण केंद्रांच्या आरक्षणात फेरबदल?

By admin | Updated: February 15, 2017 00:24 IST

संशय : विभागीय आयुक्तांकडून पालिकेला विचारणा

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने पिंपळगाव खांब आणि गंगापूर येथे दोन मलनिस्सारण केंद्र तयार करण्याच्या जागेचे आरक्षण बदलले असून, ते पब्लिक अ‍ॅमिनिटी असे नव्या विकास आराखड्यात दर्शविल्याने पालिकेच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे माहिती मागितल्यानंतर विभागीय आयुक्तांनीदेखील महापालिका आयुक्तआणि नगररचना विभागाच्या संचालकांकडे यादी मागितली होती.गोदावरी नदीत प्रक्रियेशिवाय मलजल सोडले जात असल्याने प्रदूषण होत असल्याने पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, महापालिकेने गंगापूर आणि पिंपळगाव खांब येथे मलजल प्रक्रिया केंद्र प्रस्तावित केले आहेत. महापालिकेने ही माहिती उच्च न्यायालयात दिली असून, आरक्षित जागेवर केंद्र बांधण्यासाठी तसेच भूसंपादनासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी मिळाला आहे. असे असताना आता गेल्या ९ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या शहर विकास आराखड्यात या मलनिस्सारण केंद्रांच्या जागेच्या आरक्षणात बदल करून ते पब्लिक अ‍ॅमेनिटीज असे करण्यात आले आहे.  अगोदरच्या आरक्षणाच्या नाव बदलाने महापालिकेला तेथे अशाप्रकारचे केंद्र बांधण्यात अडचणी नसल्या तरी अचानक नाव बदलण्याचे कारण काय? असा प्रश्न गोदावरी प्रकरणातील जनहित याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात कोणताही प्रकारचा बदल करायचा असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन बदल करावा, अशी विनंती पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)