शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला २०० खाटांच्या रुग्णालयाची शिफारस करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट २०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाची समिती सरकारला शिफारस करणार कळवण : ...

विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट

२०० खाटांच्या रुग्णालयाच्या प्रस्तावाची समिती सरकारला शिफारस करणार

कळवण :

महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण तालुक्याचा दौरा करीत आदिवासी भागात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयालाही भेट देत २०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालय उभारणे कामी शासनस्तरावर आमदार नितीन पवार यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची शिफारस राज्य सरकारला करणार असल्याचे समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले.

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, कामे, आश्रमशाळा, वसतिगृह, निधी संदर्भात आढावा घेत शासकीय आश्रमशाळा मोहनदरी येथे समितीने भेट देऊन पाहणी केली. कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयास समितीने भेट देऊन रुग्णालयातील अपघात कक्षातील स्वच्छता , सुसज्ज अतिदक्षता कक्ष ,शस्त्रकिया गृह , प्रसूतिपश्चात सेवा विभागातील स्वच्छता व व्यवस्थेची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. समिती सदस्यांसमवेत अवर सचिव काकड ,प्रतिवेदक शिंदे, तहसीलदार बी. ए. कापसे ,सहाय्यक प्रकल्पाधिकारी पंकज बुरकुले , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार , पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ , वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

इन्फो

सुविधांची केली खातरजमा

उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, नॉन कोविड विभागाची पाहणी करुन रुग्णांची विचारपूस केली व आरोग्य सुविधा मिळतात की, नाही याची खातरजमा केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामीण भागात असलेल्या सुसज्ज रुग्णालयाबाबत समितीने समाधान व्यक्त करत तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले. शिवाय अभिप्रायही नोंदवले.

फोटो- २५ कळवण समिती

महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी सदस्यांसमवेत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी.

250821\25nsk_21_25082021_13.jpg

फोटो- २५ कळवण समिती महाराष्ट्र विधीमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार डॉ तुषार राठोड, आमदार शिरीष नाईक व आमदार राजकुमार पाटील या त्रिसदसीय समितीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्याप्रसंगी सदस्यांसमवेत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी.