शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोणीतील कांदा पुन्हा चाळीत

By admin | Updated: July 29, 2016 22:28 IST

गोणीतील कांदा पुन्हा चाळीत

 नांदगाव : शेतकऱ्यांच्या दबावामुळे नऊ ट्रॅक्टर परतनांदगाव : प्रचलित पद्धतीने कांदा खरेदी करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत, तर गोणीत कांदा आणला तरच लिलाव खरेदी करू असा व्यापारी वर्गाचा आग्रह. हा तिढा कायम असताना बाजार समितीमध्ये गोणीत कांदा भरून विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांच्या दबावापुढे माघार घेऊन तो परत न्यावा लागला.बाजार समितीमध्ये सभापती तेज कवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी जोरकस पद्धतीने खुल्या कांदा लिलावाची मागणी केल्याने काही काळ वातावरण तापले होते. गोण्यांमध्ये भरलेला नऊ ट्रॅक्टर्स कांदा आज विक्रीसाठी आणला होता.माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांनी गोणीत कांदा आणलेल्या शेतकऱ्याचा किस्सा सांगितला. २५ गोण्या कांदा पाच व्यापाऱ्यांनी खरेदी केला व प्रत्येकाच्या खळ्यावर तो पोहोचविताना त्या शेतकऱ्याची कशी दमछाक झाली हा अनुभव सांगितला. सभापती तेज कवडे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, गोणी पद्धतीसाठी बाजार समितीमध्ये काही सुधारणा करणे गरजेचे आहे. संचालक भास्कर कासार, बाबासाहेब साठे, किरण देवरे, रमेश बोरसे, सुभाष कुटे, संजय सुरसे, अतुल पाटील, देवदत्त सोनवणे, संदीप बोरसे आदि शेतकरी चर्चेत सहभागी झाले होते. जिल्हा स्तरावरील व्यापारी असोसिएशनच्या निर्णयाप्रमाणे गोणी कांदा खरेदी करावयास येथील व्यापारी तयार असल्याचे पत्र बाजार समितीला देण्यात आले. अध्यक्ष सचिन पारख, सुमेर कासलीवाल, संदीप फोफलिया, समीर कासलीवाल नंदन करवा, संदीप खैरनार, सोमनाथ घोंगाणे यांनी सदर निर्णय घेऊन बाजार समितीला कळवले आहे.दरम्यान, बाजार समितीने जाहीर फलकाद्वारे केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दोन तीन दिवस गोणीबंद कांद्याचे लिलाव झाले होते. मात्र आज गोणीस विरोध करण्यासाठी अधिक संख्येने आलेल्या शेतकऱ्यांच्या आग्रही भूमिकेमुळे वांधा झाला. व्यापारी लिलावासाठी आले नाहीत. दरम्यान, खुल्या पद्धतीने कांदा खरेदी करण्यात यावा या आशयाचे निवेदन सभापती तेज कवडे व सचिव अमोल खैरनार यांना देण्यात आले. (वार्ताहर)