काही दिवसांपासून पिंपळगाव घाडगा, बोरखिंड, सोनांबे व लोणारवाडी गावांच्या परिसरात योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधून पाणीगळती होत होती. शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. नगर परिषदेने एकदा पाहणी करून शेतकर्यांना एअर व्हॉल्व्ह लीक करून पाणीचोरी केल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर उपनगराध्यक्ष उगले यांनी पाहणी केली असता व्हॉल्व्हमधून पाणीगळती व चोरीचे प्रमाण ‘जैसे थे’ होते. त्यांनी हा प्रकार तत्काळ मुख्याधिकारी केदार यांच्या निदर्शनास आणून दिला. मुख्याधिकारी केदार यांनी दखल घेत पाणीपुरवठा विभागाला व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या सूचना केल्या. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या ठिकाणच्या शेतकर्यांनी दुरुस्तीचे काम करण्यास विरोध दर्शविला. तथापि, पदाधिकार्यांनी शेतकर्यांशी चर्चा करून मार्ग काढला.
‘कडवा’च्या एअर व्हॉल्व्हची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST