शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना वाढीशिवाय दिले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST

महापालिकेच्या ३५९ अंगणवाड्या असून, त्यात सहा मुख्य सेविका ३४२ सेविका आणि ३४० मदतनीस याप्रमाणे कर्मचारी आहेत. त्यात मुख्य सेविकांना ...

महापालिकेच्या ३५९ अंगणवाड्या असून, त्यात सहा मुख्य सेविका ३४२ सेविका आणि ३४० मदतनीस याप्रमाणे कर्मचारी आहेत. त्यात मुख्य सेविकांना ५ हजार ५०० रुपये, सेविकांना ४ हजार ६२०, तर मदतनीसांना ४ हजार ४०० रुपये इतके वेतन दिले जाते. २०१७मध्ये या कर्मचाऱ्यांना अंतिम वेतनवाढ देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने मानधनवाढ दिली नव्हती. एरवीही महापालिकेच्या वतीने होणारे लसीकरण, घरभेटी, जनगणना, सर्वेक्षण अशी कामे या सेविकांकडून करून घेतली जातात. गेल्या वर्षी तर कोरोना संकट काळात या सेविकांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यातील अनेक महिलांना कोरोना संसर्गदेखील झाला हाेता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याअनुंषगाने प्रशासनाने सर्वच सेविकांना एक हजार रुपयांची वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव सादर केला हाेता. त्यानुसार अंदाजपत्रकात ३ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, महासभेत दोन हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाची काहीशी अडचण झाली. अंदाजपत्रकातील तरतुदीत आणखी वाढ कशी करायची, असा प्रश्न असून त्यामुळे दोन महिन्यांपासून हा विषय रखडला आहे. मात्र, याच दरम्यान या सेविकांना जून महिन्यात सेवा खंडित केल्यानंतर पुन्हा दोन महिन्यांपासून वाढीव तर सोडाच, परंतु नियमित मानधनदेखील मिळाले नव्हते. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिल्यानंतर प्रशासन हलले आणि किमान त्यांना नियमित वेतन तरी अदा करण्यात आले आहे.