शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे कोटीचे कर्ज काढण्यास मान्यता पालिकेला दिलासा: एकूण साडेतीनशे कोटींचे ऋण काढणार

By admin | Updated: May 24, 2014 00:41 IST

नाशिक : नेहरू अभियानातील कामे आणि आता कुंभमेळ्याची पूर्वतयारी यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या महापालिकेला आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण साडेतीनशे कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाली आहे.

नाशिक : नेहरू अभियानातील कामे आणि आता कुंभमेळ्याची पूर्वतयारी यामुळे आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या महापालिकेला आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एकूण साडेतीनशे कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यास मान्यता मिळाली आहे. राज्य शासनाने कालच हा निर्णय घेतला असून, महापालिकेला तो प्राप्त झाला आहे. महापालिकेला नेहरू अभियानांतर्गत कामे पूर्ण करणे, शहरातील रस्ते विकसित करणे, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत कामे करण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार दोनशे कोटी रुपये इतकेच दीर्घ मुदतीचे कर्ज उभारण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. दरम्यान, महासभेच्या ठरावानुसार आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ डिसेंबर २०१३ रोजी प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने महत्त्वाची विकासकामे आणि रस्ते तसेच सिंहस्थ पूर्व कामांसाठी कर्ज उभारण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. कर्ज उभारणीसाठी प्राप्त झालेले व्याजदर आणि अटी, शर्ती अंतिम मंजुरीनंतर राज्य शासनाला पाठविणे आणि शासनाची मंजुरी घेणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे महापालिकेची कोणतीही मालमत्ता शासनाच्या मान्यतेशिवाय गहाण ठेवता येणार नाही,अशा दोन अटी राज्य शासनाने घातल्या आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.नाशिक महापालिकेने नेहरू नागरी अभियानात सहभाग घेतल्यानंतर एकूण प्रकल्पाच्या तीस टक्के रक्कम महापालिकेलाच खर्च करावी लागणार होती. परंतु अनेक कामांसाठी पालिकेला पन्नास टक्क्यांच्या आसपास रक्कम खर्च करावी लागली आहे. त्याचप्रमाणे आता सिंहस्थ कामांसाठी आर्थिक बोजा महापालिकेची मोठी अडचण झाली होती. परंतु आता पालिकेची आर्थिक टंचाई काही प्रमाणात दूर होणार आहे....इन्फो...दुसर्‍यांदा इतके मोठे कर्जमहापालिकेने यापूर्वी शंभर कोटी रुपयांचे मोठे कर्ज १९९९-२००० मध्ये काढले होते. कॉँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना कर्जरोख्यांद्वारे ही रक्कम उभी केली होती. त्यानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज काढले जात आहे...इन्फो..अगोदरची कर्जप्रक्रिया प्रलंबितचमहापालिकेला यापूर्वी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. परंतु महापालिकेने वर्ष होत आले तरी अद्याप कर्ज काढलेले नाही. बॅँकांकडून प्रस्ताव मागविण्यातच कालहरण झाले आहे. त्यामुळे आता हे नव्याने मंजूर झालेले कर्ज कधी काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.