शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक पर्यटनाला पसंती

By admin | Updated: May 12, 2017 01:58 IST

नाशिक : शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरू असल्याने अनेक कुटुंबे परिवारासह सहलीसाठी ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपणारे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकला पसंती देत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक  : दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून, शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरू असल्याने अनेक कुटुंबे परिवारासह सहलीसाठी ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपणारे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकला पसंती देत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले असून, यंदाही इतर स्थळांसह धार्मिकस्थळांकडे पर्यटकांचा ओघ आहे. गेल्या वर्षात येथील पर्यटन व्यवसायासाठी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला होता. यावर्षीही तपमानाचा पारा उंचावल्याने निसर्ग पर्यटन व गडकिल्ल्यांना पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. गतपावसाळ्यात सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसाने नाशिककडे पर्यटकांचा पुन्हा कल वाढू लागला असला तरी नाशिकमध्ये कृषी पर्यटन स्थळे व धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्यांचेच प्रमाण अधिक आहे. नाशिक जिल्ह्यात टुरिझम, गड- किल्ले, डोंगर-दऱ्या व मोकळा परिसर असे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. परंतु या ठिकाणी पर्यटक पावसाळा अथवा हिवाळ्यात भेट देण्यास प्राधान्य देतात. तर उन्हाळ्यात येथील त्र्यंबकेश्वरसह गंगा गोदावरी मंदिर, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर मंदिर, नारोशंकर (रामेश्वर) मंदिर, बालाजी मंदिर, यशवंतराव महाराज मंदिर, मोदकेश्वर गणपती, काट्या मारुती, तपोवन, भद्रकाली मंदिर, सोमेश्वर मंदिर, गंगेश्वर वेदमंदिर आदि विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढले आहे. पांडवलेणी, चांभारलेणी, श्री सप्तशृंगी देवी, टाकेद तीर्थ, रामशेज डोंगर, कपिलधारातीर्थ कावनई आदि धार्मिक स्थळी प्रर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे चित्र आहे.