शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नगर पथविक्रेता समितीची होणार पुनर्रचना

By admin | Updated: March 28, 2017 23:15 IST

नाशिक :महापालिकेमार्फत नगर पथविक्रेता समितीची लवकरच पुनर्रचना करण्यात येणार असून, नवीन तरतुदीनुसार समितीवर विविध संघटनांच्या पाच सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेमार्फत नगर पथविक्रेता समितीची लवकरच पुनर्रचना करण्यात येणार असून, नवीन तरतुदीनुसार समितीवर विविध संघटनांच्या पाच सदस्यांची नियुक्तीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोनचा आराखडा तयार केला असून, सदर आराखडा आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्तांनी यापूर्वी आपल्या अधिकारात शहर फेरीवाला समिती गठीत करत त्यावर विविध हॉकर्स संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व दिले होते. आता सदर समितीचा कार्यकाल संपुष्टात आला असून, नवीन तरतुदीनुसार, नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्यासाठी नोंदणीकृत हॉकर्सचे मतदान घेऊन समितीवर सदस्य निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यापूर्वी, महापालिकेमार्फत सदर समितीवर अशासकीय संघटना, समुदाय आधारित संघटना, निवासी कल्याण संघ, व्यापारी संघ आणि पणन संघ यांचा प्रत्येकी एक सदस्य नामनिर्देशित केला जाणार आहे. त्यासाठी मनपाने संबंधित संघ - संघटनांकडून पात्र व्यक्तीचे नामनिर्देशन मागविले आहे. त्यासाठी ८ एप्रिल २०१७ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदर व्यक्तींची नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाल्यानंतर ती मान्यतेसाठी शासनाकडे पाठविली जाणार आहेत. या संघ-संघटनांवरील व्यक्तींना नामनिर्देशनासाठी काही अटीही महापालिकेने घातल्या असून, निकषात बसणाऱ्यांचीच समितीवर नियुक्ती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)पथविक्रेत्यांची नोंदणी महापालिकेने यापूर्वी हॉकर्स झोनचा आराखडा तयार करताना सुमारे साडेनऊ हजार फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली होती. मात्र, ज्या विक्रेत्यांची नोंदणी अजूनही शिल्लक आहे, त्यांनाही नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. सदर विक्रेत्यांची नोंदणी करून घेतली जाणार असून, त्यानंतर एकत्रित मतदार यादी तयार करून ती कामगार आयुक्तालयाकडे पाठविली जाणार आहे. सदर मतदारांमार्फत पथविक्रेता समितीवर आठ सदस्यांसाठी निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.