शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जनसहभागातून मंदिराचा जीर्णाेद्धार

By admin | Updated: May 23, 2017 00:54 IST

नाशिक : आगर टाकळी येथील मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ येथील ३८४ वर्ष जुन्या गोमय मारुती मंदिर जीर्णाेद्धाराचा शुभारंभ सोमवारी (दि .२२) हाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आगर टाकळी येथील मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ येथील ३८४ वर्ष जुन्या गोमय मारुती मंदिर जीर्णाेद्धाराचा शुभारंभ सोमवारी (दि. २२) अमळनेर येथील प्रसाद महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी बोलताना प्रसाद महाराज यांनी, मठाचे सामर्थ्य विशद करताना सरकारकडून तसेच भक्तांच्या जनसहभागातून या मंदिराचा जीर्णाेद्धार व्हावा, अशी भावना व्यक्त केली. तसेच अमळनेर येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानातर्फे नव्याने उभारल्या जाणाऱ्या गोमय मारुती मंदिराला सोन्याचा कळस देणार असल्याची घोषणा केली. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. दरम्यान, भूमिपूजनाच्या धार्मिक सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. ढवळे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, सुधीर शिरवाडकर, जोतिराव खैरनार, प्रकाश पवार, विजया माहेश्वरी, दिलीप कैचे यांच्यासह भाविक उपस्थित होते.संपूर्ण भारतभरात विविध ३०० हून अधिक मंदिरे साकारणारे राजू परदेशी यांच्याकडून या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. संस्थानचे विश्वस्त जोतिराव खैरनार यांनी यावेळी वर्षभरात मंदिराचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. जीर्णाेद्धार सोहळ्यास उपस्थित असलेल्या भाविकांकडून मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी देणगी देण्यात आली आणि देणगीदारांना प्रसाद महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.