शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात रोजच पडतेय झोपड्यांची भर पालिकेचे दुर्लक्ष : केवळ नोटिसांपुरतेच उपचार

By admin | Updated: May 25, 2014 00:14 IST

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : नदीपात्रालगत विशिष्ट अंतरात घरे बांधणे धोकादायक मानले जात असताना शहरातील गोदावरी आणि नासर्डी नदीपात्रात रोजच नव्या झोपड्यांची भर पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशा धोकादायक घरांना स्थलांतरीत होण्याच्या औपचारिक नोटिसा दिल्या जातात. परंतु तरीही घरे नदीपात्रातच असल्याने जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरीकरणामुळे रोजच शेकडो नागरिक रोजगाराच्या शोधासाठी नाशिकमध्ये येतात आणि याच शहरात वास्तव्यास राहतात. निवार्‍यासाठी असे नागरिक झोपडप˜्यांचा आधार घेतात. प्रामुख्याने नदीकाठीच अशाप्रकारे झोपड्या होतात आणि त्या वाढतात. शहरात अशा अनेक झोपडप˜्या असून, त्या हटवणे पालिकेला शक्य झालेले नाही. गोदाकाठी मल्हारखाण झोपडप˜ी अशीच वसली गेली आणि आता अधिकृतही झाली आहे. परंतु तेथेही झोपड्या वाढत चालल्या आहेत. नासर्डी नदीलगत तर अशा मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. सातपूर येथील महादेववाडी, कांबळेवाडी या झोपडप˜्या अशाच प्रकारे वसल्या असून, त्या आयटीआय पूल आणि त्यापलीकडेदेखील वाढल्या आहेत. मुंबई नाका आणि त्यानंतर आता शिवाजीवाडी अशाच प्रकारे वाढत आहे. एरव्ही ही नदी बारमाही नसल्याने अडचण उद्भवत नाही. परंतु पावसाळ्यात पुराच्या पाण्याने घरे आणि झोपड्या वाहून जाण्याचा धोका असतो. त्याचबरोबर अनेकदा जीवित हानी होते. तरीही झोपडप˜्या बांधायचे थांबत नाही. त्यामुळे केवळ  अतिक्रमणे रोखणार कोण?महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग स्वतंत्र आहे. परंतु या विभागामार्फत अशा प्रकारे अतिक्रमण होऊच नये, यासाठी कोणतेही परिश्रम घेतले जात नाही. परिणामी हा प्रश्नही सुटत नाही. घरकुल योजनेचा पर्यायही दूरचनदीपात्रातील धोकादायक झोपडप˜ीवासीयांना महापालिकेच्या घरकुल योजनेतील घरे देण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. परंतु अनेक नागरिकांकडे पुरावा नाही आणि समजा घरे दिलीच तरी पुन्हा याच ठिकाणी झोपडप˜्या वाढणार नाहीत, याची शाश्वती नाही.