शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शर्तींच्या जमिनी अखेर शासनजमा

By admin | Updated: May 25, 2015 23:49 IST

नांदगाव तहसीलदारांची सारवासारव

 नाशिक : आपल्याच अधिकारात शासनाच्या शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला नजराणा न भरताच बेकायदेशीर अनुमती देणाऱ्या नांदगाव तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपलेच आदेश मागे घेत, ज्या जमिनींचे व्यवहार होऊन शासन दप्तरी त्याच्या नोंदी झाल्या अशा जमिनी एकतर्फी शासन जमा करण्याची कार्यवाही केली असून, त्यांच्या या कृत्याने मात्र शर्तभंग झालेल्या जमीनमालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी त्याची दखल घेत याबाबत सविस्तर चौकशीचे आदेश दिले होते. त्याचबरोबर महाजन यांनी कशाच्या आधारे शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारांना परवानगी दिली त्याची माहितीही मागविली होती. मिळालेल्या माहितीनुसार महाजन यांनी दिलेल्या अनुमतीच्या आधारे जवळपास ५१ प्रकरणांमध्ये शासनाला नजराण्याची कोट्यवधीच्या रक्कमेवर पाणी सोडावे लागले. शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सदर जमिनीच्या बाजारमूल्याच्या पन्नास टक्के रक्कम शासनाच्या तिजोरीत नजराणा म्हणून भरावी लागते, परंतु शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारांना अनुमतीची गरज नसल्याचे पत्र दुय्यम निबंधकांना देऊन महाजन यांनी शासनाच्या महसुलाचे नुकसान तर केलेच त्याचबरोबर या व्यवहारांची शासन दप्तरी तडकाफडकी नोंदी घेतल्या गेल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. तहसीलदार महाजन यांनी या साऱ्या बेकायदेशीर कृत्यातून बाहेर पडण्यासाठी सारवासारव करून आता ज्या ज्या जमिनींच्या नोंदी करण्यात आल्या त्या शर्त भंग ठरवून शासन जमा करण्यास सुरुवात केली आहे. शर्त भंग जमिनी शासन जमा करताना संबंधित दोन्ही बाजूच्या व्यक्तींना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे जाणून घेणे क्रमप्राप्त असताना महाजन यांनी जमीनमालकांना नोटिसा न बजावता थेट संबंधित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. अशा नोंदीमुळे आता ज्या ज्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झाले तेदेखील बेकायदेशीर ठरले आहेत.