शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रिफ्लेक्टर न लावलेले ट्रॅक्टर सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 16:36 IST

पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हात ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघात संख्येत प्रचंड वाढ झाली असून, निष्पाप नागरिक बळी ठरत आहे.

ठळक मुद्दे अपघाताला आमंत्रण : बेकायदेशीर ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावरील अन्य वाहनांना धोका

पिंपळगाव बसवंत : सध्या ऊसतोडणी हंगाम जोमात असून, रस्त्यावर ऊस वाहून नेणाऱ्या विनारिफ्लेक्टर लावलेल्या ट्रॅक्टर्सची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जिवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हात ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरच्या अपघात संख्येत प्रचंड वाढ झाली असून, निष्पाप नागरिक बळी ठरत आहे.ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते. पिंपळगाव परिसरात मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्यात सहा अपघात झाले असून, या अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागला होता, तर अनेकजण अजूनही त्या अपघातामुळे त्रास सहन करत आहे. यातून या प्रश्नाचे गांभीर्य समोर येते. साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टर्सना प्राधान्य देण्यात येते.मात्र वाहनचालकांना वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली जात नाही. साखर प्रशासनाचे वचक ट्रॅक्टरचालक याच्यावर नसल्याने बेफिकिरीने बेकायदेशीर ऊस वाहतूक केली जाते. त्याचबरोबर ट्रॅक्टरमालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. परंतु सदर वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात.उसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ टन इतकी असते. परंतु, यामध्ये १८ ते २० टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणाºया ट्रॅक्टर्संच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाइटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात......चौकट..काही दिवसांपूर्वी ‘पडलं तर व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतो’, असा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. यामध्ये उसाने ओव्हरलोडेड झालेला ट्रॅक्टर कोसळतो. ट्रॅक्टरमध्ये क्षमता नसताना ऊस भरण्यात आला होता. याचा गांभीर्याने विचार करणे आणि त्यावर कृती होणे गरजेचे आहे............................विनारिफ्लेक्टर वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळेत डबल ट्राली लावून जात असतात त्यामुळे अपघात होत असतात.सुरक्षा सप्ताह केवळ दिखाऊ नको...उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रत्येक वर्षी सुरक्षा सप्ताह छायाचित्रांपुरता साजरा केला जातो, असे दिसते आहे. या कार्यालयाकडून साखर कारखान्यांवर जाऊन ट्रॅक्टर, ट्रेलरला रेडियम पट्ट्या लावून हा सप्ताह साजरा केला जातो. मात्र, आजही या ऊस वाहतूक तसेच इतर वाहनांकडून सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहिले जात नाही, असे असतानाही या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचे दिसत नाही....या करता येतील उपाययोजनाऊस वाहतुकीच्या वाहनांना सेवा रस्ता सक्तीचा करावा, सर्व वाहनांना सुरक्षेच्या उपाययोजना सक्तीच्या कराव्यात, विनारिफ्लेक्टर वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक बंदीचा विचार व्हावा, ऊस वाहतुकीसह इतर वाहने पार्किंगला बंधने घालावीत, हॉटेलजवळील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करावी.(25पिंपळगाव टृॅक्टर)