शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कश्यपी प्रकल्पग्रस्तांची भरती, नेमली उपसमिती

By admin | Updated: May 18, 2017 01:10 IST

मंत्रालयात बैठक : अहवाल सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने स्थापन केलेल्या समितीची पहिली बैठक मंगळवारी (दि.१६) मंत्रालयात झाली. यावेळी, समितीने प्रकल्पग्रस्तांसंबंधीचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांची संयुक्त उपसमिती स्थापन केली आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, महापालिकेने आपला अहवाल तयार करून तो शासनाला रवाना केला होता. या अहवालानुसार सन २००१ मध्ये महापालिका महासभेने ठराव करत कश्यपीचा संबंध संपुष्टात आल्याचे आणि शासनाकडे जमा असलेली ५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम परत करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याशिवाय, मनपाने २३ प्रकल्पग्रस्तांना महापालिका सेवेत सामावून घेतले, परंतु कश्यपीचा संबंध उरला नसल्याने शासनाने सदर प्रकल्पग्रस्तांना शासन सेवेत सामावून घेण्याचाही ठराव केला होता. महापालिकेने अहवाल सादर केल्यानंतर शासनाने कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या भरतीप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्यात महापालिका आयुक्तांचाही समावेश होता. सदर समितीची पहिली बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. या बैठकीला आयुक्त अभिषेक कृष्ण उपस्थित होते. शासनाने २००९ पासून सरळ सेवेतून भरती करण्यास मनाई केली असल्याची माहिती यावेळी महापालिकेमार्फत देण्यात आली तर जलसंपदा विभागाकडे पूर्ण माहिती नसल्याने अखेर अध्यक्षांनी पुढच्या बैठकीत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशित केले. याशिवाय, आतापर्यंत किती प्रकल्पग्रस्तांना सेवेत घेण्यात आले, इतरांचे प्रस्ताव का प्रलंबित ठेवले याची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांची उपसमिती नेमली आहे. शासनाचे वेळकाढू धोरणमुळात महापालिकेचा कश्यपी धरणाशी असलेला संबंध संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे उर्वरित प्रकल्पग्रस्तांना शासनानेच आपल्या सेवेत सामावून घ्यावे, असा ठराव महासभेने केलेला आहे. शासनाच्या कोर्टात चेंडू असताना शासनानेही आता वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले असल्याचे दिसून येते. शासनाने समितीच्या पाठोपाठ स्थापन केलेली उपसमिती हे त्याचेच निदर्शक असल्याचे बोलले जात आहे.