शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत लवकरच भरती आयुक्तांचे सूतोवाच: पावसाळापूर्व कामांना सुरुवात

By admin | Updated: May 24, 2014 01:10 IST

नाशिक : महापालिकेत रिक्तपदांमुळे कर्मचार्‍यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन सुमारे दीड हजार मंजूरपदांसाठी भरती मोहीम राबविण्याचे सूतोवाच प्रभारी आयुक्तसंजीव कुमार यांनी केले आहे. एमकेसीएलसारख्या शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेची मदत घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

नाशिक : महापालिकेत रिक्तपदांमुळे कर्मचार्‍यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन सुमारे दीड हजार मंजूरपदांसाठी भरती मोहीम राबविण्याचे सूतोवाच प्रभारी आयुक्तसंजीव कुमार यांनी केले आहे. एमकेसीएलसारख्या शासनाने प्राधिकृत केलेल्या संस्थेची मदत घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.विविध नागरी कामांसंदर्भात मनसेच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी ही माहिती दिली. महापालिकेत यापूर्वी एक हजार पदे राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर भरतीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला होता. कुणाल आयटी या पुण्याच्या संस्थेमार्फत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र मुलाखतीसाठी पात्र व्यक्तींना पत्र पाठविताना गोंधळ तसेच अन्य अनेक कारणांमुळे ही भरतीप्रक्रिया स्थगित करून रद्द करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचा ठराव करण्यात आला. परंतु अद्याप ही प्रक्रिया राबविली गेलेली नाही. आता भरतीबाबत आढावा घेऊन भरती करता येऊ शकेल असे आयुक्तांनी सांगितले. महापालिकेने या पूर्वी भरतीप्रक्रियेसाठी काढलेल्या जाहिरातीत सुमारे दोनशे अभियंता, दीडशे वैद्यकीय अधिकारी आणि सहाशे लिपिक अशा पदांसाठी ही भरती होणार होती.दरम्यान, महापालिकेच्या वतीने शहरात पावसाळापूर्व कामांना प्रारंभ झाला आहे. नाले सफाईची ५३ आणि झोपडप˜ीतील ६४ अशा ११७ कामांना सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयुक्त संजीव कुमार आणि शहर अभियंता सुनील खुने यांनी दिली. या कामांसाठी दोन कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. झोपडप˜ीत उघडे नाले आणि गटारी आहेत ते स्वच्छ करण्यात येत आहे.शहरात गरजेनुसार टॅँकरने पाणीशहरात पाणीटंचाईच्या तक्रारी होत असल्या तरी महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ज्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होईल तेथे महापालिकेच्या वतीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. सध्या पालिकेकडे सहा टॅँकर आहेत.३५ घंटागाड्यांची लवकरच खरेदीमहासभेने ३५ घंटागाड्यांच्या खरेदीस मान्यता दिल्यानंतर देखील खरेदीची कारवाई केली जात नसल्याची तक्रार मनसेने केली. परंतु आचारसंहितेमुळे खरेदी रखडली होती. लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) रमेश पवार यांनी सांगितले.