शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पाच थकबाकीदारांकडून सहा लाखांची वसुली

By admin | Updated: March 9, 2017 01:59 IST

नाशिकरोड : मनपानेथकीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या रक्कम वसुलीबाबत ‘ढोल बजाओ’ उपक्रमाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी पाच जणांकडून तब्बल १६ लाख रुपयांची धनादेशाद्वारे वसुली केली आहे

नाशिकरोड : मनपानेथकीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या रक्कम वसुलीबाबत ‘ढोल बजाओ’ उपक्रमाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी पाच जणांकडून तब्बल १६ लाख रुपयांची धनादेशाद्वारे वसुली केली आहे. दत्तमंदिर सिग्नल शेजारील वैथरा इमारतीचे बेसमेंट सील करण्यात आले आहे.मनपाने गेल्या अनेक वर्षांपासून थकलेली पाणीपट्टी, घरपट्टी, विविध कर आदिंच्या वसुलीसाठी संबंधित थकबाकीदारांकडे जाऊन थकीत वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम हाती घेतली आहे. यामुळे थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी नाशिकरोडला ६७ हजारांची थकीत वसुली करण्यात आली होती.मनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर तसेच घरपट्टी, पाणीपट्टी विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी मंगळवारी ढोल-ताशा पथक सोबत घेऊन जेलरोड येथील एका मंगल कार्यालयाजवळ ‘ढोल बजाओ’ उपक्रम राबविला. यावेळी संबंधित थकबाकीराने साडेचार लाखांचा आजच्या तारखेचा धनादेश व ६ लाख ७० हजार रुपयांचा तीन दिवसांनंतरचा धनादेश दिला. आर्टिलरी सेंटररोड येथील एका रो-हाउस मालकाने ७७ हजार, जेलरोड दसक भागातून दोघा थकबाकीदारांनी मिळून ९३ हजारांचा एका धार्मिक स्थळाजवळील लॉजिंग दुकानांची थकलेली ३ लाख १७ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे वसूल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी तब्बल १६ लाखांची थकबाकी धनादेशाद्वारे वसूल करण्यात आली. तर आशीर्वाद बस थांब्याजवळील एका बॅँकेला भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्याची घरपट्टी थकीत आहे. त्यासंदर्भात संबंधित गाळे मालकधारकांशी २४ लाखांच्या थकबाकीबाबत मनपा अधिकाऱ्यांचे बोलणे झाले असून, येत्या तीन-चार दिवसांत संबंधित मालक ती रक्कम देणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपाच्या ‘ढोल बजाओ’ उपक्रमाचा थकबाकीदारांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत असून थकीत रक्कमेची वसुली वाढू लागली आहे. मनपाने थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणात वसुली मोहीम राबवावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)