शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
5
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
6
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
7
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
8
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
9
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
10
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
11
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
13
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
14
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
15
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
17
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
18
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
19
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
20
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

५२ वर्षांपूर्वीचा मतांचा विक्रम अबाधितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:06 IST

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून नाशिक मतदारसंघात ५९.४० तर दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविले गेले आहे.

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून नाशिक मतदारसंघात ५९.४० तर दिंडोरीत ६५.६४ टक्के मतदान नोंदविले गेले आहे.नाशिक मतदारसंघात तब्बल ५२ वर्षानंतर मतदानाची आकडेवारी ६० टक्क्यांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे तर दिंडोरीमध्ये ५७ वर्षानंतर या आधीच्या विक्रमी ६६.७६ टक्के मतदानाच्या आसपास आकडेवारी जाऊन पोहोचली आहे. मतदानाचा हा वाढलेला टक्का प्रामुख्याने नवमतदारांचा असल्याचे सांगितले जात आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणावर जागृती होऊनही दोन्ही मतदारसंघातील विक्रम मात्र अद्याप मोडू शकलेला नाही.नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या १७ लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक ६५.७९ टक्के मतदान १९६७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नोंदविले गेले असून तोच आजवरचा विक्रम आहे. त्यानंतर ५२ वर्षात आजवर कधीही मतदानाच्या टक्केवारीने साठी ओलांडलेली नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५८.८३ टक्के मतदानाची नोंद झालेली होती. यंदा मात्र मतदानाच्या टक्केवारीत अल्पशी वाढ झाली असून नाशिकमध्ये ५९.४० टक्के मतदान नोंदविले गेले आहे. तब्बल ५२ वर्षानंतर मतदान साठीच्या आसपास जाऊन पोहोचले आहे.दिंडोरी मतदारसंघातही १९५७ मध्ये झालेल्या पूर्वाश्रमीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात ६६.७६ टक्के मतदान झाले होते. हा आजवरचा विक्रम आहे. तो अद्याप मोडू शकलेला नाही. मागील निवडणुकीत २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ६३.४१ टक्के मतदान झाले होते. यंदा हा आकडा ६५.६४ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. १९६२ मध्ये ६२.५९ तर १९९९ मध्ये ६४.५० टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा १९५७ मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या टक्केवारीच्या आसपास जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण व आदिवासी भागात मतदानाचा मोठा उत्साह दिसून आला. प्रामुख्याने, तरुण नवमतदार आणि महिला मतदार मोठ्या प्रमाणावर घराबाहेर मतदानासाठी पडल्याचे दिसून आले.मतदानाची टक्केवारीवर्ष नाशिक मालेगाव1951 53.17 ---1957 48.13 63.401962 54.18 66.761967 65.79 62.591971 57.35 55.891977 54.70 51.741980 53.42 47.271984 56.51 55.931989 54.84 52.021991 50.72 44.421996 48.58 41.721998 51.65 48.091999 57.88 64.502004 43.13 48.352009 45.42 47.572014 58.83 63.41

2019    59.40          65.64

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक