शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या सभेत ‘उजळणी’

By admin | Updated: July 15, 2016 00:08 IST

वर्गसदस्यांमध्ये चढाओढ : आयुक्तांसमोर बुद्धिप्रदर्शन

नाशिक : महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच स्थायी समितीला सामोरे गेलेले आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासमोर बुद्धिप्रदर्शनासाठी सदस्यांमध्ये चढाओढ लागली, परंतु आयुक्तांनी केवळ श्रोत्याची भूमिका घेत भाष्य न करणेच पसंत केले. स्थायीच्या सभेत वारंवार झालेल्या चर्चेनंतरही पुन्हा त्याच त्या प्रश्नांची उजळणी होऊ लागल्याने अखेर सभापतींना सदस्यांच्या उत्साहाला आवर घालावा लागला. नूतन आयुक्त अभिषेक कृष्ण यांची पहिलीच सभा असल्याने स्थायी समितीवरील काही उत्साही सदस्यांनी इतिवृत्तांतील विषयांवरही चर्चा करण्याचा आग्रह धरला. इतिवृत्त दुरुस्तीसह मंजूर केले जाईल, असे सभापती सलीम शेख यांनी स्पष्ट करूनही सदस्य आपल्या बुद्धिप्रदर्शनाला लगाम घालायला तयार होईनात. भाजपाचे दिनकर पाटील यांनी आघाडीवर येत जुन्याच विषयांवर पुन्हा चर्चा सुरू केली. फाळके स्मारकातील कामगारांच्या वेतनापासून ते घंटागाडी, खतप्रकल्प, उद्याने आदि विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली. अग्निशमन दलातील डिझेल घोटाळ्यावर पुन्हा एकदा चर्चेसाठी पाटील उभे राहिले असता सभापतींनी त्यांना रोखले आणि पाटील यांना सविस्तर अहवाल देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला दिले. यावेळी अग्निशमन प्रमुख अनिल महाजन यांनी सदर अहवाल आयुक्तांच्या मान्यतेनंतर देण्यात येणार असल्याचे सांगताच पाटील यांचा पारा चढला आणि सभापतींनी अहवाल मागितला असता आयुक्तांचा संबंध येतोच कुठे, असा पवित्रा घेतला. यावेळी सभापती शेख व पाटील यांच्यात शाब्दीक चकमकही झडली.