दुसंगवाडी येथील ढमाले वस्तीवरील रोहित्रावर १५ कृषी ग्राहक असून त्यांची सप्टेंबर २०२० पर्यंत २ लाख ८१ हजार ८८० रुपये इतकी थकबाकी होती. उप अभियंता ऋषिकेश खैरनार, वावी वीज उपकेंद्राचे शाखा अभियंता अजय साळवे यांनी संबंधित शेतकऱ्यांना कृषी धोरण २०२० मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्याचे आवाहन केले होते. त्यास तत्काळ प्रतिसाद देत येथील १५ शेतकरी ग्राहकांनी थकबाकी असलेली सर्व रक्कम महावितरणकडे भरून सहकार्य केले. कृषी धोरण २०२० च्या नियमाप्रमाणे वसूल झालेल्या एकूण रकमेतून ३३ टक्के रक्कम ही त्या रोहित्रावरील दुरुस्तीच्या कामांसाठी खर्च करण्यात आली. त्यातून डिस्ट्रीब्युशन बॉक्स बसवण्यात आला. नवीन केबलही बसवण्यात आली. त्यामुळे येथील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कृषी धोरणात सहभागी शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST