शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही संमेलनस्थळ, उद्घाटकांविषयी दोन दिवसांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन ...

नाशिक : संविधान सन्मानार्थ १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनच्या उद्घाटनाविषयी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार झाला असून यासंदर्भात पुढील दोन दिवसांत त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे संमेलन स्थळाविषयी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

विद्रोही साहित्य संमेलन संपर्क कार्यालय म्हणजे, शेकाप कार्यालयात रविवारी (दि.२१) संमेलन संयोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उद्घाटक, अध्यक्ष, संमेलन नियोजन, निधीसंकलन व संमेलनस्थळ आदी विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने उद्घाटन सोहळ्यासाठी पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांचा निर्णय दोन दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती संमेलन समितीकडून उपस्थितांना देण्यात आली. त्याचसोबत संमेलन स्थळासंदर्भातही यावेळी सविस्तर चर्चा झाली. सुमारे तीन हजार लोक बसण्याची व्यवस्था व पन्नास बुक स्टॉलची सुविधा उपलब्ध होईल, अशी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यासाठी ठिकाणांची पाहणी सुरू असून दोन दिवसांतच संमेलनस्थळ जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संमेलन निधी संकलनासाठी ‘मूठ भर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी’ या मोहिमेची सुरुवात बुधवारपासून नाशिकरोड येथून होणार असल्याचेही सांगण्यात आले. बैठकीला संमेलनाच्या मुख निमंत्रक प्रा. इंदिरा आठवले, किशोर ढमाले, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवने, गणेश उन्हवने, व्ही.डी.जाधव, प्रभाकर धात्रक, मुख्य विश्वस्त ॲड.मनीष बस्ते, मुख्य संयोजक राजू देसले, राकेश वानखेडे, नितीन भुजबळ, नानासाहेब पटाईत, यंशवत बागुल, अर्जुन बागुल, संजय उन्हवने, देवीदास हजारे, अरुण शेजवळ, विनायक पाठारे, रविकांत शार्दुल, दादाजी बागुल, अनिल आठवले, सुशीलकुमार पवार आदी उपस्थित होते.

===Photopath===

210221\21nsk_35_21022021_13.jpg

===Caption===

विद्रोही संमेलन संयोजन समितीच्या बैठकीस उपस्थित मुख्य निमंत्रक प्रा. इंदिरा आठवले.समवेत किशोर ढमाले, शशिकांत उन्हवने, गणेश उन्हवने, व्ही.डी.जाधव, प्रभाकर धात्रक,  ॲड.मनिष बस्ते, राजू देसले, राकेश वानखेडे, नितीन भुजबळ, नानासाहेब पटाईत आदी.