शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

रेशन दुकानदार आजपासून संपावर

By admin | Updated: December 31, 2016 23:53 IST

आज बैठक : घासलेट विक्रेत्यांचा पाठिंबा

नाशिक : रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दुकानासाठी धान्य न उचलण्याचा निर्णय रेशन दुकानदार महासंघाने घेतला असून, त्यांच्या या संपाला घासलेट विक्रेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवारी दुपारी रेशन दुकानदार संघटनेची बैठक बोलविण्यात आली आहे. शासकीय धान्य गुदामातून थेट रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याची शासनाची जबाबदारी असताना ती पाळली जात नाही, उलट हमालांकडून जबरदस्तीने पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे हमालीमुक्त धान्य मिळावे, कमी केलेला घासलेटचा कोटा पूर्ववत करावा, आधारकार्ड क्रमांक गोळा करण्याचे काम शासकीय यंत्रणेने करावे आदि मागण्यांसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्यामुळे राज्य फेडरेशनने बेमुदत धान्य व केरोसिन कोटा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांच्या या मागण्यांना घासलेट विक्रेत्यांनी पाठिंबा दर्शवून १ जानेवारी पासून घासलेट न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता कालिका सभागृह येथे बैठक बोलविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)