शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांना बॅँक प्रतिनिधी दर्जा

By admin | Updated: January 25, 2017 00:31 IST

पुरवठा खात्याची बैठक : दुकानदारांचा सत्कार

नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र व राज्य सरकारने रोकड विरहित व्यवहार करण्यावर भर दिलेला असताना अन्न व नागरी पुरवठा खात्यानेही सार्वजनिक वितरणप्रणालीत कॅशलेसपद्धती आणण्याचा प्रयत्न चालविला असून, त्यासाठी रेशन दुकानदारांनाच प्रोत्साहन देण्याचा व त्यांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना बॅँकेच्या सुविधा देण्यासाठी रेशन दुकानदारांना बॅँक प्रतिनिधीचा दर्जा देण्यात येणार असल्याचे संकेत प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिले आहेत.  मंगळवारी नाशिक विभागातील सर्व पुरवठा अधिकारी, सहायक पुरवठा अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पाठक यांच्या अध्यक्षतेखाली व कक्ष अधिकारी महादेव जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील निरंजन देवळे ग्रुप सोसायटी रेशन दुकान क्रमांक तीन व सप्तशृंगी महिला बचत गट, कांचने या दोन रेशन दुकानांमध्ये रोखविरहित अन्नधान्य वितरण सुरू करण्यात आल्याबद्दल पाठक यांनी समाधान व्यक्त केले व ज्या शिधापत्रिकाधारकांनी या योजनेत सहभागी होऊन रोकडविरहित अन्नधान्य खरेदी केले त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. शासनाने कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण स्वीकारलेले असून, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुविधांचा शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा व यात सहभागी व्हावे यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.  ई सार्वजनिक वितरणप्रणाली लागू करण्याचे कामकाज येत्या काळात तीन टप्प्यांत केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्हा, तर दुसऱ्या टप्प्यात जळगाव व तिसऱ्या टप्प्यात नाशिक, नगर व धुळे या तीन जिल्ह्यांचा समावेश राहणार असल्याचे पाठक यांनी जाहीर केले. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय गुदामांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याबद्दल तसेच दरमहा सात तारखेस अन्नदिन साजरा होत असल्याबद्दल पाठक यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस पुरवठा उपआयुक्त रघुनाथ गावडे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी देवगुणे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)