शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडेंच्या अटकेने रेशन दुकानदार धास्तावले

By admin | Updated: November 30, 2015 23:45 IST

मिलीभगत : धान्य काळाबाजाराचे होणार पोलखोल

नाशिक : जिल्ह्णातील रेशन धान्याच्या काळ्याबाजारात गुंतलेल्या घोरपडे बंधंूभोवती पोलिसांनी चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केल्यानंतर या धंद्यात वर्षानुवर्षे घोरपडेंना साथ देणारे रेशन दुकानदार धास्तावले असून, अनेकांनी त्यांच्याशी आपले संबंध नव्हतेच, असा पवित्रा घेतला आहे. संपत घोरपडे व त्याच्या भावाविरुद्ध मोक्कान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनी या साऱ्या प्रकरणाला चालना मिळाली असली तरी, रेशनचा वर्षानुवर्षे काळाबाजार करून त्यातून घोरपडेंनी जमविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ‘माया’चा मार्ग पोलिसांना दाखविण्यात याच धंद्यातील काहींनी मदत केली आहे. घोरपडे यांचे जिल्ह्णातील रेशन दुकानदारांशी, तसेच रेशनच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांशीही संबंध तर होतेच, परंतु शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेल्या संंबंधाअभावी तो काळाबाजार करूच शकत नसल्याने जिल्ह्णात गेल्या काही वर्षांपासून धान्य काळाबाजार करणाऱ्याची साखळी तयार झाली आहे. गोरगरिबांच्या नावे शासनाकडून स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचे वाटप न करता, त्याची थेट खुल्याबाजारात चढ्या दराने विक्री करण्याच्या या व्यवसायात रेशन दुकानदार, शासकीय यंत्रणेलाही घोरपडे यांच्याइतकाच लाभ झाला असून, तशी बाबही सोमवारी सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे घोरपडे यांनी रेशनच्या काळ्याबाजारातून ज्याप्रमाणे कोट्यवधीची मालमत्ता गोळा केली, ती कशी केली, कोणाच्या संगमनताने केली या साऱ्या बाबी गुन्ह्णाच्या तपासाचा भाग असल्यामुळे आजवर त्यांच्याशी व्यावसायिक व अर्थपूर्ण संबंध ठेवून असलेल्या साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे.