संस्थेने अशा दिव्यांगांना मदत करण्यासाठी संस्था आली आपल्या दारी संकल्पना राबवली असून दृष्टिहीन व्यक्तींची होणारी उपासमार लक्षात घेऊन १२० अंध कुटुंबांना किमान एक महिना पुरेल एवढे सर्व प्रकारचे रेशन किराणा आणि भाजीपाला देण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय धमाल आणि मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात काही कुटुंबांना रेशनचे किट देण्यात आले. शालिमार येेथील संस्थेच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात किटचे तसेच सॅनिटायझर आणि मास्कचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी अजित बने आणि डॉ. कनोजिया यांनी देखील उपक्रमास मदत केली. त्यानंतर दिव्यांग कुटुंबांच्या घरी जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या किटचे वाटप केले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, मानद अध्यक्ष कल्पना पांडे आणि कोषाध्यक्ष विजया दबे यांनी दिली. या उपक्रमाकरिता लायन राजू व्यास उद्योजक अनिल जैन यांच्यासह अनेक दानशूरांनी मदत केली.
छायाचित्र आर फोटोवर ०५ ब्लाइंड नावाने सेव्ह.
===Photopath===
070621\07nsk_26_07062021_13.jpg
===Caption===
ब्लाईंड ऑर्गनायझेशनच्या वतीने दिव्यांग कुटूंबियांना रेशन वाटप