नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आठवड्यातील प्रत्येक दिवशी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुलांनी त्यांना शिकविलेले संगीत, गाणे, नृत्य, वाद्यवादन सादर केले. याशिवाय फ्लॅश मॉप, डेडीकट ए सॉँग या संकल्पनेच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. अभ्यासाबरोबरच मुलांच्या कलागुणांनाही वाव मिळावा यासाठी हा प्रयत्न होता.
रासबिहारी शाळेत सांगितिक कार्यक्रम
By admin | Updated: June 26, 2014 00:48 IST