नाशिक : एका तेवीस वर्षीय मुलीसह तिच्या आई-वडिलांना वेळोवेळी मारहाण करून संबंधित मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदिरानगर येथील वैभव सोनार या युवकावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान सोनार फ रार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वैभव सोनार (रा़आकाशगंगा अपार्टमेंट, चार्वाक चौक, इंदिरानगर) हा अशोका मार्ग परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय मुलीला तिच्या आई-वडिलांना मारहाण करण्याची धमकी, तर पीडित तरुणीला वेळोवेळी मारहाण करीत असे़ सोनारने शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याची फि र्याद या पीडित तरुणीने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़पोलिसांनी संशयित वैभव सोनार याच्यावर बलात्कार, मारहाण व आर्म अॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनार फ रार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)
शस्त्राचा धाक दाखवून युवतीवर बलात्कार
By admin | Updated: July 19, 2014 01:01 IST