शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पित्यासह अन्य तिघांचा मुलीवर बलात्कार

By admin | Updated: January 14, 2016 00:19 IST

पित्यासह अन्य तिघांचा मुलीवर बलात्कार

निफाड : तालुक्यातील करंजी शिवारात पित्यानेच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर अन्य तिघा नराधमांनीदेखील तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. यातील एका संशयित तरुणाने या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचे उघड झाले आहे. यातील तिघा संशयितांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे, तर चित्रीकरण करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बालगृहात पाठविण्यात आले आहे. बलात्कारी पिता अद्यापही फरार आहे. सदर पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती आपल्या गावाहून २२ डिसेंबर रोजी कावीळ उतरविण्यासाठी आपल्या पित्यासमवेत गेली होती. तेथून परतताना करंजी शिवारातील एका नाल्यात सकाळी साडेआठच्या सुमारास पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला. मात्र ही घटना चौघा तरुणांनी पाहिल्यानंतर दमदाटी करत त्यातील तिघांनी त्या मुलीवर बलात्कार केला. या प्रसंगाचे चौथ्या संशयिताने मोबाइलव्दारे चित्रीकरण केले. त्यानंतर चौघांनी त्या मुलीला धमकी देत करंजीच्या दिशेने पळ काढला. पीडित मुलीच्या नातेवाइकांनी याबाबत विचारणा करताच तिने घडलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार सायखेडा पोलीस ठाण्यात पित्यासह संशयित मंगेश तांबेकर (१९), सुकदेव तांबेकर (२५), उद्धव अडसरे (२३) व अल्पवयीन विकास शिंदे (१७) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी वेगाने तपास करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांना २२ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. एकास बालसुधारगृहात पाठविण्यात आले. संशयित नराधम पिता फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)