शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी राजकारणातून संन्यास घ्यावा : महाजन

By admin | Updated: April 16, 2015 00:23 IST

राणेंनी राजकारणातून संन्यास घ्यावा : महाजन

नाशिक : सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना केलेल्या नारायण राणे यांनी आता राजकारणातून संन्यास घ्यायला हवा. त्यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय असून, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे, असा सल्ला जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत सलग दुसऱ्यांदा नारायण राणे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाजन यांना नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमात विचारले असता, त्यांनी हे वक्तव्य केले. नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सलग वीस वर्षे कोकणातून प्रतिनिधित्व केले आहे. मुख्यमंत्री तथा महसूलमंत्री पदाचाही कार्यभार सांभाळला आहे. मात्र, गेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीपाठोपाठ वांदे्र पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांनी आपली राजकीय घोडदौड थांबवायला हवी. त्यांची दोन्ही मुले राजकारणात असल्याने त्यांना आता संधी द्यायला हवी. तसेच पुन्हा अशाप्रकारची निवडणूक लढविण्याचे धाडस करू नये, असेही महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)