शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘रामसृष्टी’ला अजूनही वनवास

By admin | Updated: December 20, 2015 22:16 IST

तात्पुरती मलमपट्टी : दुरवस्था कायम; कचऱ्याचे ढीग आणि मद्याच्या बाटल्या

नाशिक : सिंहस्थात रामसृष्टी उद्यानाचे रूप पालटेल अशी अपेक्षा असताना केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यामुळे रामसृष्टी उद्यान अजूनही वनवासातच आहे. या उद्यानाचा वापर पर्यटकांना होण्याऐवजी गैरकृत्यासाठीच अधिक होत असून, तपोवनातील या उद्यानाचे पावित्र्य जपण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, कचऱ्याचे ढीग आणि सर्वत्र घाण निर्माण झाली आहे. तपोवनातील एक आकर्षक उद्यान म्हणून खरे तर या उद्यानाची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. सिंहस्थात हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करणे गरजेचे होते, परंतु या ठिकाणी सिंहस्थाच्या काळात अनेक भिकाऱ्यांचे येथे वास्तव्य होते. काही पर्यटकही या ठिकाणी मुक्कामी राहिले. याच ठिकाणच्या जवळपास प्रात:विधी केली जात असल्याने परिसरात पसरलेली दुर्गंधी आजही कायम आहे. उद्यानासमोरील जागेत साठलेले मातीचे ढीग आणि झाडेझुडुपे वाढल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि उष्टे अन्न टाकण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तर दुर्गंधित अधिकच भर पडली आहे. नदीच्या एका कोपऱ्याला उद्यान असल्याने या उद्यानाची पुरेशी देखभाल केली जात नसल्यामुळे या ठिकाणी नेहमीच गैरप्रकार चालतात. कुंभमेळ्यात गर्दीमुळे प्रेमीयुगुलांचा वावर कमी झाला असला तरी सध्या भिकाऱ्यांनी या उद्यानाचा ताबा घेतलेला आहे. या उद्यानात सर्वत्र घाण आणि कचरा साचला आहे. सध्या पावसामुळे याठिकाणी चिखल झाला असून, ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी अगोदरच पडून असलेला कचरा कुजल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उद्यानाच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, कित्येक दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नसल्याने आता दुर्गंधी सुटली आहे. (प्रतिनिधी)