शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर रविवारी रमजानचा पहिला ‘रोजा’

By admin | Updated: May 23, 2017 17:12 IST

रमजान पर्वाचे शनिवारी (दि.२७) चंद्रदर्शन घडल्यास येत्या रविवारपासून रमजानच्या उपवासांना प्रारंभ

नाशिक : निर्जळी उपवासांचा (रोजा) महिना म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या रमजान पर्वाचे शनिवारी (दि.२७) चंद्रदर्शन घडल्यास येत्या रविवारपासून रमजानच्या उपवासांना प्रारंभ होणार आहे. इस्लामी कालगणनेचा नववा उर्दू महिना रमजानुल मुबारक आहे. या महिन्यात मुस्लीमबांधव सुमारे पंधरा तासांचा निर्जळी उपवास महिनाभर ठेवतात. पहाटे सूर्योदयापूर्वीच अल्पोपहाराचा विधी (सहेरी) करून उपवासाला प्रारंभ केला जातो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या वेळेनुसार फलहार करून उपवास (इफ्तार) सोडला जातो. हा नित्यक्रम संपूर्ण महिनाभर सुरू असतो. रमजानपर्वामध्ये मुस्लीम बांधवांची दिनचर्या पूर्णपणे बदललेली पहावयास मिळते. पहाटे उठण्यापासून धार्मिक कार्यांना सुरुवात होते. धर्मग्रंथ कुराणचे पठण, पाचवेळा काटेकोरपणे नमाजपठणाचे पालन तसेच रात्री ‘तरावीह’च्या विशेष नमाजचे पठण करण्यावर नागरिक या कालावधीत भर देतात. त्याचप्रमाणे या महिन्यात दानधर्मालाही विशेष प्राधान्य दिले जाते. आत्मशुद्धीचे पर्व म्हणून रमजान महिन्याकडे बघितले जाते. बहुसंख्य मुस्लीम नागरिकांनी रमजानपर्वच्या उपवासांचे वेळापत्रक छापले असून, मशिदींमधून वाटप करण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर रमजान कालावधीत मशिदींमध्ये नमाजपठणाकरिता होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील सर्व मशिदींमध्ये तयारीला वेग आला आहे. मशिदींमधील विद्युत, पाणी, बैठक व्यवस्थेची तपासणी केली जात आहे. नादुरुस्त दिवे, नळांची दुरुस्तीलाही सुरुवात करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.