शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित

By admin | Updated: June 26, 2014 01:16 IST

रमजान पर्वाचे वेळापत्रक निश्चित

 

जुने नाशिक : गेल्या ‘शब-ए-बरात’च्या पवित्र रात्रीमध्ये धर्मगुरूं च्या बैठकीत शाही मशिदीत रमजान पर्वाच्या ‘रोजा सहेरी-इफ्तार’बरोबर अजानचेदेखील संपूर्ण महिन्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.येत्या शनिवारी चालू उर्दू महिन्याची २९ तारीख असल्यामुळे आगामी रमजान महिन्याचे चंद्रदर्शन घडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शाही मशिदीत स्थानिक चांद समितीच्या वतीने धर्मगुरूंची बैठक बोलविण्यात आली आहे. मुस्लीम बांधवांनी शनिवारी चंद्रदर्शन घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, तसेच चंद्रदर्शन झाल्यास तातडीने शाही मशिदीत समक्ष उपस्थित राहून ग्वाही द्यावी, असे आवाहन सय्यद मीर मुख्तार यांनी केले आहे. गेल्या वर्षी शहरात छापण्यात आलेल्या रमजानच्या वेळापत्रकामध्ये अनवधानाने रोजा सोडण्याची अर्थात इफ्तारच्या वेळांमध्ये त्रुटी आढळून आल्याने समाजबांधवांचा गोंधळ होत होता. यावर्षी कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नये, यासाठी धर्मगुरूंनी एकत्र येऊन सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळांचा अभ्यास करून रमजानचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या वेळापत्रकाच्या एकूण दोन हजार प्रती शहरासह जिल्ह्यातील विविध मशिदींमध्ये तसेच प्रिंटिंग प्रेसचालकांकडे पोहचविण्यात आल्याचे खतिब यांनी सांगितले. (वार्ताहर)