दहा दिवसात दोघा भावंडांचे निधन
भगुर : येथील शीतल मित्र मंडळाचे प्रमुख राजेंद्र आनंदराव कुवर (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई कुवर यांचे ते पती होत. दरम्यान, राजेंद्र कुवर यांचे बंधू प्रमोद आनंदराव कुवर यांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा शोक अनावर झाल्याने पाच दिवसांपूर्वी राजेंद्र कुवर किरकोळ आजारी पडले आणि मोठा भाऊ प्रमोद कुवरच्या दशक्रिया विधीदिनीच निधन झाले. (फोटो १७ राजेंद्र)
-----
पंढरीनाथ घुगे
पंचवटी : सेवानिवृत्त एसटी कर्मचारी पंढरीनाथ भिकाजी घुगे (रा. रासबिहारी रोड, ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. बिटको कॉलेजचे प्राध्यापक विष्णू घुगे यांचे ते वडील होत. (फोटो १७ घुगे)