शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे नाशिककरांवर नाराज

By admin | Updated: March 11, 2017 01:42 IST

नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

 नाशिक : नाशिकमध्ये आपण विकासकामे केली हीच मोठी चूक झाली, असे उपहासपूर्ण विधान करत यापुढे लोकांना जे हवे त्याचा पुरवठा करणारे उद्वेगजनक भाव मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात बोलताना व्यक्त केल्याने मनसेच्या नाशिकमधील वाटचालीबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. कामे करूनही मते न मिळाल्याने नाशिककरांवर राज नाराज झाल्याने मनसेने साकारलेल्या प्रकल्पांच्या भवितव्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. महापालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात एकूणच निकालावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठिकठिकाणी घेतलेल्या जाहीर सभांमध्ये नाशिकमधील मनसेच्या प्रकल्पांचे सादरीकरण करत विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे मते मागितली होती. राज यांच्या या प्रचाराची चांगली हवाही तयार झाली होती. परंतु, प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत मनसेला मागील निवडणुकांच्या तुलनेत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेने ९७ उमेदवार रिंगणात उतरविले होते. मात्र, केवळ ५ उमेदवारांनाच विजयाला गवसणी घालता आली. नाशिकप्रमाणेच मुंबई, पुणे, ठाणे याठिकाणीही मनसेला झटका बसत संख्याबळ घटले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रथमच राज ठाकरे यांनी छोटेखानी भाषण करताना पराभवाचे धक्कादायक विश्लेषण केले आणि पक्षाची आगामी वाटचाल कोणत्या पाऊलवाटेवरून असेल, याचे संकेतही दिले. मात्र, ज्या शहरात विकासाचे प्रकल्प राबविले तेथील मतदारांनी नाकारल्याने राज नाराज झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात मनसेने साकारलेले बॉटनिकल गार्डन, इतिहास वस्तू संग्रहालय, वॉटर कर्टन, उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण, शंभर फुटी कारंजा या प्रकल्पांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पांची पक्षाकडून काळजी वाहिली जाईल की नाही, याबाबत तर्कवितर्कला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)