शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीवर राजच प्रथम बोलले

By admin | Updated: September 27, 2016 23:58 IST

बाळा नांदगावकर यांचा दावा

नाशिक : मराठा समाजाचे अशा प्रकारचे मोर्चे निघतील हे राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वीच भाकीत केले होते, इतकेच नव्हे तर कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर सर्वप्रथम तेथे भेट देताना राज यांनी अ‍ॅट्रॉसिटीच्या दुरुपयोगाविषयी धाडसाने विधान केले होते, असे विधान कधी बाळासाहेबांनीही (ठाकरे) केले नव्हते, असा दावा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. राज ठाकरे यांच्या  सर्व सभांचे नियोजन मी करतो. दोन वर्षांपूर्वी सोलापूर येथे जाहीर सभेत राज यांनी मराठा समाजाची अवस्था बघूून आता राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघतील, असे सांगितले होते. तेथून परतल्यानंतरदेखील त्यांनी एका खासगी वाहिनीशी बोलतानाही त्याची पुनरावृत्ती केली होती, असे ते म्हणाले. राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, मुंबईत हा मोर्चा झाल्यानंतर राज पुन्हा बोलतील असे सांगून नांदगावकर म्हणाले की, राज्यातील सरकार राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंटमधील योजनाच कॉपी पेस्ट करीत आहेत. नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजनेत मनसेने सुचविलेल्याच योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले. आम्ही कमी पडलो...आगामी महापालिका निवडणुकींच्या कामासाठी मनसे कामाला लागली आहे. नाशिकमध्ये मनसेची अनेक कामे झाली आहेत, ती लोकांपर्यंत पोहचवण्यात कमी पडलो हे त्यांनी मान्य केले. राज्य सरकारच्या हट्टाग्रहामुळे चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नगरसेवक अन्य पक्षांत जात असल्याचा दावाही त्यांनी केला.