शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

‘पावसाळी गटार’ कुचकामी

By admin | Updated: July 21, 2016 22:48 IST

ठिकठिकाणी साचतेय पाणी : नाशिककर भोगतोय सदोष योजनेचे दुष्परिणाम

नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेने शहरात सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून ‘पावसाळी गटार योजना’ राबविली, परंतु या योजनेची नेमकी उपयुक्तता काय, याचे कोडे आजपर्यंत नाशिककरांना उलगडलेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात या योजनेचे पितळ उघडे पडत आले आहे. परंतु, महापालिका प्रशासन त्याच्यापासून धडा शिकायला तयार नाही आणि लोकप्रतिनिधीही त्याबाबत फारसे गंभीर नाहीत. दोन आठवड्यांपूर्वी दि. १० जुलै रोजी झालेल्या पावसाने गंगापूर धरण एकाच दिवसात २७ टक्क्यांनी भरले आणि शहरातही जागोजागी पावसाच्या पाण्याची तळी साचली. दोन आठवड्यांनंतरही पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. त्यामुळे महापालिकेची पावसाळी गटार योजना किती कुचकामी ठरली आहे, याचा प्रत्यय येतो.आजवर महापालिकेमार्फत ज्या काही योजना राबविल्या गेल्या त्यात सर्वाधिक रकमेच्या म्हणजे सुमारे ४०० कोटी रुपयांच्या ‘पावसाळी गटार’ योजनेचा समावेश होतो. महापालिकेच्या सुकाणू समितीने केंद्र व राज्य सरकारकडे ३२८ कोटी ३३ लाख रुपयांचा आराखडा सादर केला होता. त्यात शासनाने कपात करत ती ३१० कोटींवर आणली होती. महापालिकेने निविदाप्रक्रिया राबवून योजनेच्या ६१ कामांना सन २००७ मध्ये मंजुरी दिली होती. सदर योजना राबविण्यापूर्वी त्यावर टीकाही भरपूर झाली होती. नाशिकची भौगोलिक स्थिती पाहता पावसाचे पाणी वाहून नेण्याइतपत ही योजना उपयुक्त ठरेल काय, असे प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु, योजनेचे अनेक फायदे पटवून देत प्रशासनाने शहरात सदर योजना राबविण्यास सुरुवात केली. त्यासाठी शहरात ३०५ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याला मंजुरी मिळाली होती. योजनेसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडला होता. कोणतेही नियोजन न करता ही योजना साकारण्यात आल्याने अनेक आरोपही झाले. गैरव्यवहार-भ्रष्टाचारामुळे योजना गाजली. अधीक्षक अभियंत्याचे निलंबनही झाले होते. सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वी सदर योजना पूर्णत्वाला गेली; परंतु ती संपूर्ण शहरात नव्हे तर ठरावीक भागातच राबविण्यात आली. मात्र आतापर्यंत या योजनेचा नेमका काय फायदा झाला, याचे कोडे नाशिककरांना आजपर्यंत सुटलेले नाही. दर पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याचा अनुभव नाशिककर घेत आले आहेत. ज्या भागात पावसाळी गटार योजना राबविली गेली नाही तेथील अवस्था तर भयावह आहे, परंतु जेथे योजना राबविली तेथील स्थिती तर आणखी अवघड बनलेली आहे. पाण्याचा निचराच होत नसल्याने आजही अनेक भागात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेली तळी पहायला मिळतात.