शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात ‘रेनकोटचे’ भिंजत घोेंगडे

By admin | Updated: July 17, 2016 01:39 IST

आदिवासी विकास : दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

नाशिक : आधी निविदा मागवायच्या आणि नंतर निविदेला फाटा देऊन परस्पर खरेदी प्रक्रिया राबवायची, असा काहीसा प्रकार आदिवासी विकास आयुक्तालयाने केला आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे दोन लाख विद्यार्थी ऐन पावसाळ्यातही ‘चिंब’ भिजतच शिक्षणाचे धडे गिरवित असल्याचे वृत्त आहे.सोलापूर वगळता राज्यभरातील आदिवासी विकास आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या चार अपर आयुक्त कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या २८ प्रकल्पांमधील हा घोळ मिटलेला नाही. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने या पावसाळ्यात सुमारे एक लाख ९० हजार विद्यार्थ्यांना पावसाळ्यापासून बचावासाठी रेनकोट खरेदी करण्यासाठी ८ ते १६ जून दरम्यान निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. २१ जून रोजी या निविदा उघडण्यात येणार होत्या. दरम्यानच्या काळात निविदा संपुष्टात येण्याच्या तारखेच्या दिवशीच म्हणजे १६ जून रोजी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे यांचे पत्र आदिवासी विकास आयुक्तालयास प्राप्त झाले. त्यात सोलापूर प्रकल्प वगळता अन्य सर्व प्रकल्पांत २५ जूनच्या आत रेनकोटचा पुरवठा करणे शक्य होत नसल्याने तीन लाखांच्या मर्यादेच्या आत रेनकोट खरेदी करण्याचे अधिकार त्या त्या प्रकल्पातील मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात यावे, असे म्हटले होते. तीन लाखांच्या पुढे ई-निविदा बंधनकारक असल्याने बहुधा तीन लाखांपर्यंतचेच अधिकार मुख्याध्यापकांना प्रदान करून आदिवासी विकास विभागाने ई-निविदांपासून पळवाट काढल्याचे बोलले जाते. नाशिक प्रकल्पांतर्गत या रेनकोट पुरवठ्यासाठी एकूण १० निविदा विभागाला प्राप्त झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यानच्या काळात ई-निविदा पद्धतीने रेनकोटचा पुरवठा करण्यासाठी स्पर्धेत असलेल्या सुपर पॉलिमर कंपनीने या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने आता आदिवासी विकास विभागाला मुख्याध्यांपकारवी खरेदी करण्याऐवजी या रेनकोटसाठी फेरनिविदा काढण्याचे आदेश विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)