शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला तासभर पाऊस; वीज गायब

By admin | Updated: May 18, 2014 23:47 IST

त्र्यंबकेश्वर : शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेमोसमी पावसाचे आगमन झाले. तासभर चांगला पाऊस पडून रस्त्यावरील खड्डे पावसाने भरले. मुख्य रस्ता सोडून अन्य ठिकाणी चिखल झाला. अनेक भागांत गेल्याने नागरिकांचे हाल झाले. उष्णतेने सर्वच हैराण झाले. त्यातही डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोठे जावे कोठे बसाव, बाहेर पाऊस त्यामुळे केव्हा एकदा वीज येते असे वाटत होते. यात्रेकरूंची तर अत्यंत गैरसोय झाली.

त्र्यंबकेश्वर : शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेमोसमी पावसाचे आगमन झाले. तासभर चांगला पाऊस पडून रस्त्यावरील खड्डे पावसाने भरले. मुख्य रस्ता सोडून अन्य ठिकाणी चिखल झाला. अनेक भागांत गेल्याने नागरिकांचे हाल झाले. उष्णतेने सर्वच हैराण झाले. त्यातही डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोठे जावे कोठे बसाव, बाहेर पाऊस त्यामुळे केव्हा एकदा वीज येते असे वाटत होते. यात्रेकरूंची तर अत्यंत गैरसोय झाली. गेल्या महिना-पंधरा दिवसात जिल्‘ात अवकाळी पावसाने उच्छाद मांडला आहे. त्र्यंबकला किरकोळ थेंबा व्यतिरिक्त त्र्यंबकला पाऊस पडला नव्हता. आज मात्र त्र्यंबकला सुमारे तास-दीडतास बर्‍यापैकी पाऊस पडला. तत्पूर्वी जोरदार वारे, विजा चमकू लागल्या आणि यात वीज गायब झाली. संबंधित अधिकार्‍याला विचारले असता १० ते १५ मिनिटात वीज येईल आणि त्याप्रमाणे झालेही तसेच मात्र केवळ १० मिनिटे विज सप्लाय होता. आणि त्यानंतर जी वीज गेली ती लवकर येईना, अधिकार्‍यांना पुनश्च विचारले तर अंबड लाईन फॉल्ट झाल्याचे समजते. काही वेळात प्रजापती आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी भर अंधारात पाटपीट करून फॉल्ट शोधला. आणि सर्वांना वीज उपलब्ध करून दिली.तथापि अंधारामुळे परगावाहून आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. एकाएकी पाऊस आल्याने सर्वांची पळापळ झाली. दर्शन कोठे करावे, कोणाच्या घरी पुजेला जायचे आहे ते कळेना अशी सर्वांची गत झाली. घरात उष्मा आणि डास तर बाहेर पाऊस. पाऊस थांबला तर अंधाराचे साम्राज्य. दरम्यान बर्‍याचजणांचे घरांची बांधकामे सुरू आहे. यासर्वांना धावपळ करावी लागली. (वार्ताहर)