शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा झटका; आरक्षणात घट

By admin | Updated: November 12, 2016 01:52 IST

चपराक : रेल्वे आरक्षणाचा मार्गही झाला खडतर

 मनोज मालपाणी  नाशिकरोडरेल्वे तिकीट आरक्षण करून काळा पैसा पांढरा करण्याची शक्कल लढविणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाने चांगलीच चपराक दिली आहे. संबंधितांनी केलेले आरक्षण रद्द करताना काही निर्बंध घातल्याने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर एकाच दिवसांत ६५ टक्के आरक्षणात घट झाली आहे.केंद्र शासनाने मंगळवारी रात्री चलनातुन ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली. मात्र प्रवासी, रूग्ण, सर्वसामान्य आदिंची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्राचे ९, १० व ११ नोव्हेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत रेल्वे तिकीट, आरक्षण कार्यालय, विमानतळ, शासकीय रुग्णालय आदि ठिकाणी चलनातून बाद ठरलेल्या ५०० व १ हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याची घोषणा केली होती. केंद्राने ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी एक दिवस बॅँक बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे बहुतेक जण आपल्या जवळील ५०० व १ हजाराची नोट खपविण्याच्या विविध क्लृप्त्या वापरत होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सकाळी ८ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत आरक्षण केंद्र सुरू असते. तर रात्री ८ ते १० पर्यंत आरक्षणाची एकच खिडकी सुरू असते. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर दररोज ६ ते ८ लाख रुपयांचे सरासरी तिकीट आरक्षण होते. तसेच आगामी दोन ते चार महिन्यांनी सुटीचा कालावधी असेल तर ८ ते १० लाख रुपयांचे तिकीट आरक्षण होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मंगळवारी १० लाख ५ हजार रुपयांचे तिकीट आरक्षण झाले होते; मात्र पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्दबातल करण्याचे जाहीर केल्यानंतर बुधवारी अचानक तिकीट आरक्षणामध्ये मोठी वाढ होत १६ लाख ८४ हजारांचे तिकीट आरक्षण झाले आहे. पाचशे व एक हजाराची नोट तिकीट आरक्षणासाठी वापरून कालांतराने ते आरक्षण रद्द करून आपला काळा पैसा पांढरा करण्याचे स्वप्न काहीजणांनी उराशी बाळगले होते; मात्र केंद्र व रेल्वे प्रशासनाने ९, १० व ११ नोव्हेंबर रोजी १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे तिकीट आरक्षण असेल तर त्यांचा रिफंड आरक्षण खिडकीवर मिळणार नाही असे जाहीर केले. त्याकरिता संबंधितांना ते तिकीट आरक्षण टीसी कार्यालयात जमा करून त्यांना तिकीट डिपॉझिट रिसीट (टीडीआर) भरून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्य संबंधित प्रवाशाच्या नावाने रिफंडचा धनादेश त्यांच्या घराच्या पत्त्यावर पाठविण्यात येणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. ‘चोर पे मोर’ अशी केंद्र व रेल्वे प्रशासनाने भूमिका घेतल्याने बुधवारच्या मानाने तिकीट आरक्षणात ६५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. बुधवारी नाशिकरोडला १६ लाख ८४ हजाराचे तिकीट आरक्षण झाले होते. तर गुरुवारी तिकीट आरक्षण ८ लाख ३३५ रुपयांचे झाले आहे. तर शुक्रवारी सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत फक्त साडेपाच लाखांचे तिकीट आरक्षण झाले आहे. मोदी शासनाने काळ्याचा पांढरा करणारा हा रस्तादेखील बंद केल्याने तिकीट आरक्षण नियमित झाल्याचे चित्र दिसत आहे.