शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार यादीच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:00 IST

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली असली तरी, अशा प्रकारची यादी जाहीर करताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करण्यात आल्याने या यादीच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सदरची  बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली असली तरी, अशा प्रकारची यादी जाहीर करताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करण्यात आल्याने या यादीच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सदरची  बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या मतदार यादीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देण्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने यादी प्रसिद्ध करण्यात आल्याने त्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू झाली आहे.  विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्य आमदार जयंत जाधव यांची मुदत २६ जून रोजी संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने २० एप्रिल रोजी राज्यातील सहा विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या सभापतींना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्णात मालेगाव व नाशिक महापालिका, १५ नगरपंचायत, नगरपरिषद व जिल्हा परिषद असे सर्व मिळून ६४४ मतदार असून, या मतदारांची प्रारूप मतदार यादी २५ एप्रिल रोजी व अंतिम मतदार यादी २ मे रोजी जाहीर करण्यात आली आहे. या यादीच्या आधारेच निवडणुकीचा कार्यक्रम राबविला जात असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांकडून निवडणूक कायद्यान्वये कलम ३० अन्वये १७ क्रमांकाचा अर्ज त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार नोंदणी अधिकाºयांनी भरून घेणे निवडणूक आयोगाने कायद्याने सक्तीचे केले आहे. त्यात स्वत: मतदाराने आपले नाव, मतदार संघाचे नाव, स्वत:चा पत्ता असे नमूद करून मतदार नोंदणी अधिकाºयाला आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे, अशी विनंती करावयाची आहे. मतदाराने अशी विनंती केल्यानंतर मतदार नोंदणी अधिकाºयाने मतदाराचे नाव जाहीर करून त्यावर कोणाच्या हरकती अथवा सूचना असतील तर त्या नोंदविण्यासाठी तीन दिवसांची मुदत द्यावी व त्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करावी, अशी तरतूद कायद्यात देण्यात आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची मतदार यादी जाहीर करताना निवडणूक आयोगाच्या कायदेशीर तरतुदीकडे काणाडोळा करून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका, नगरपंचायत मुख्याधिकाºयांच्या स्वाक्षरीने त्यांच्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थातील सदस्यांची यादी मागून तीच मतदार यादी म्हणून प्रसिद्ध केली आहे.  कोणत्याही निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे व सूचना निश्चित केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाप्रमाणेच पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार म्हणून हक्क बजावण्यापूर्वी मतदारांनी विहित नमुन्यात निवडणूक आयोगाचा अर्ज भरून देण्याची तरतूद आहे व त्याशिवाय मतदानाचा अधिकार बहाल केला जात नाही, ही वस्तुस्थिती असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मात्र निवडणूक आयोगाच्या सूचना व नियमांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे आयोगाच्या कायद्याचे व नियमांचे पालन करता जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीच्या वैधतेबाबत कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक