शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दोन हंगामांचे दुःख बाजूला ठेवून द्राक्ष उत्पादक लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे ...

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असले तरी पालखेड लाभ क्षेत्राखाली तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून द्राक्ष बागेची लागवड केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी अर्ली द्राक्ष छाटणीचा प्रयोग गेला असून द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे. द्राक्षबाग म्हटले की एप्रिल छाटणीपासून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कामे चालू होतात. छाटणी झाल्यानंतर सपकेन, केन याबरोबरच काडी परिपक्वतेसाठी विविध औषधांच्या मात्रा देऊन साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्षाची छाटणी करतात. पण गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता, दोन वर्षांत कधी कोरोनाचे संकट, तर कधी निसर्गाचे संकट, यातून वाचून द्राक्षबाग आली तर व्यापाऱ्यांचे संकट, अशा अनेक संकटांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रासल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे. सध्या ढगाळ वातावरण व पावसाची काही प्रमाणात रिमझिम सुरू असतानाही शेतकऱ्यांनी द्राक्ष (ॲक्टोबर) छाटणीचा प्रारंभ केला आहे.

-----------------

पुनश्च हरिओम

सलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे द्राक्ष मातीमोल भावाने विकावा लागली आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. चालू द्राक्ष हंगामात उपलब्ध द्राक्षाची टप्प्याटप्प्याने छाटणी करून उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचा मानस आहे. या वर्षीही द्राक्ष पिकास बाजारभाव व निसर्ग कसा असेल हे आज जरी सांगणे शक्य नसले तरी शेतकरी सगळे विसरून पुनश्च कामाला लागला आहे हे नक्कीच..!

---------------------------

खर्चात वाढ

द्राक्ष पीक दिवसेंदिवस खर्चीक बनत चालले असून औषधे, रासायनिक खते, लिक्विड खते यांच्यात झालेली भरमसाट वाढ तसेच मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने चार पैसे अधिक देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत.

--------------------------

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आलेला आहे. दरवर्षाच्या तुलनेत यंदा अर्ली छाटणीस प्रारंभ केला आहे. दोन वर्षांपासून कर्जबाजारी झालेला द्राक्ष उत्पादक नफा-तोटा विसरून पुन्हा नव्याने स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागला आहे. त्या ला हवी आहे फक्त आता निसर्गाची साथ..!

- सुदाम सौंदाणे, द्राक्ष उत्पादक, शेवगे

-----------------

जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली द्राक्षाची छाटणी. (१६ जळगाव नेऊर ग्रेप्स)

160921\16nsk_8_16092021_13.jpg

१६ जळगाव नेऊर ग्रेप्स