शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर ‘तुरी’

By admin | Updated: May 6, 2017 01:25 IST

नाशिक : जिल्ह्यात चार ठिकाणी सुरू असलेली तूर खरेदी २२ एप्रिलनंतर बंद करण्यात आल्याने अद्यापही जिल्ह्यातील ५ ते ६ हजार क्विंटल तूर खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात चार ठिकाणी सुरू असलेली तूर खरेदी २२ एप्रिलनंतर बंद करण्यात आल्याने अद्यापही जिल्ह्यातील ५ ते ६ हजार क्विंटल तूर खरेदी रखडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.दरम्यान, खळ्यात काढून ठेवलेली तूर दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांची नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारीपासून जिल्ह्यात येवला, नांदगाव, मालेगाव व बागलाण या चार तालुक्यांत महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेडच्या संयुक्त विद्यमाने तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तूर विक्री केंद्रे उभारण्यात येऊन १२२८ शेतकऱ्यांनी त्यांची ११४२० क्विंटल तूर विक्री केली त्यापोटी जिल्हा मार्केटिंग विभागाकडून या १२२८ शेतकऱ्यांना ५०५० रुपये क्ंिवटल भावाने पाच कोटी ७६ लाख ७१ हजार रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी दिली. शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर खरेदी करण्यासाठी नाफेड, एसएफएससी, एफसीआय या केंद्र सरकारअंतर्गत असलेल्या संस्थांमार्फत खरेदीची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशन या दोन संस्थांमार्फत खरेदी करण्यात आली. साधारणत: मार्चअखेरपर्यंतच ही तूर खरेदी केली जाते. यंदा उत्पादन चांगले झालेले असल्याने मार्चनंतर सरकारने तीनवेळा मुदतवाढ देऊन ही खरेदी-विक्री केंदे्र सुरू होती. यावर्षी हमीभाव ५०५० इतका जाहीर झाल्याने शेतकऱ्यांनी सरकारी तूर खरेदी केंद्राकडे गर्दी केली. कारण मुख्य बाजारात तुरीचे भाव ३००० ते ४००० हजारांपर्यंत खाली कोसळले. राज्यात विदर्भात तुरीचे चांगले उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांनी सरकारी तूर खरेदी केंद्राकडेच गर्दी गेली.