शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर प्रचार, १९० उमेदवारांना परवाना

By admin | Updated: February 14, 2017 01:19 IST

व्हॉट्स अ‍ॅपला पसंती : १४, २१ मधून सर्वाधिक अर्ज; भ्रमणध्वनीवर प्रचारपत्रकांचा मारा

नाशिक : चार सदस्यीय प्रभाग रचना होतानाच प्रभागाची व्याप्तीही वाढल्याने अल्प कालावधीत सर्वच मतदारांपर्यंत जाऊन पोहोचणे उमेदवारांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी महापालिकेकडून आतापर्यंत १९० उमेदवारांना परवाना देण्यात आला असून, त्यात व्हॉट्स अ‍ॅपला सर्वाधिक पसंती आहे. दरम्यान, प्रभाग १४ व २१ मधून सर्वाधिक उमेदवारांनी परवाना प्राप्त केले आहेत.  महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला जात असला तरी सर्वच मतदारांपर्यंत जाऊन पोहोचणे कठीण आहे. त्यामुळेच मतदारांपर्यंत आपली उमेदवारी पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. मात्र, सोशल मीडियावर प्रचार करण्यापूर्वी उमेदवारांसह राजकीय पक्षांना महापालिकेच्या सोशल मीडिया सेलकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. सदर सेलमार्फत सोशल मीडियाच्या कोणत्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा प्रचार केला जाणार आहे, याची पडताळणी केली जाते. त्यात काही आक्षेपार्ह नसेल तरच परवानगी दिली जात आहे. महापालिकेने आतापर्यंत सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी १९० उमेदवारांना परवानगी दिली आहे. उमेदवारांकडून सोशल मीडियावरील व्हॉट्स अ‍ॅपला सर्वाधिक पसंती दिली जात असून, त्याखालोखाल फेसबुक, एसएमएस, ट्विटर आणि ई-मेलचा वापर केला जात आहे. व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सध्या नागरिकांच्या भ्रमणध्वनीवर उमेदवारांच्या प्रचारपत्रकांचा सारखा मारा होत आहे. याशिवाय, एसएमएसनेही धुमाकूळ घातला असून, रोज कुणा महापुरुषाच्या पुण्यतिथी-जयंतीनिमित्त अभिवादन-आदरांजली वाहून विविध समाज घटकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)