शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाच्या याद्या बांधकाम विभागाला द्या:बाळासाहेब क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:26 IST

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असले तरी,  प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी बांधकाम विभागाला पाठविण्यास विविध विभागांकडून विलंब होत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक विभागाने आजच्या आज संबंधित याद्या बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहेत. 

ठळक मुद्देजि.प. च्या स्थायी समिती सभेत चर्चा

नाशिक : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सर्व विभागांचे नियोजन पूर्ण झाले असले तरी,  प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी बांधकाम विभागाला पाठविण्यास विविध विभागांकडून विलंब होत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन प्रत्येक विभागाने आजच्या आज संबंधित याद्या बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी या विषयावर चर्चा झाली. अनेक विभागांनी आपले नियोजन पूर्ण करून कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. परंतु बांधकाम विभागाकडे कामांची यादी देण्यात आली नसल्याची बाब आत्माराम कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिली. प्रशासकीय मान्यता देण्यात आली असेल तर याद्या दडवून ठेवण्याचे कारण काय, अशी विचारणा त्यांनी केली. जर याद्या बांधकाम विभागाकडे देण्यात आल्या नाहीत तर कामांचे अंदाजपत्रक कधी तयार करणार व निविदा कधी काढणार,  कामे कशी पूर्ण होणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यावर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सर्व खातेप्रमुखांना सदरच्या याद्या तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या. या सभेत किरण थोरे यांनी म्हरळगोई येथील शाळा निर्लेखित होऊन वर्षाचा कालावधी उलटला तरीदेखील शाळा पाडली जात नाही. जर भविष्यात ही शाळा कोसळून अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतही निर्लेखित झाली असून, या ठिकाणी कुत्र्यांचा वावर असल्याची बाब थोरे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर चालू आर्थिक वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तरतूद करण्यात आली असून, नवीन इमारत बांधण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. याच वेळी भास्कर गावित यांनी सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये शौचालयांची कामे होऊनही ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार केली. या सभेस उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, सुरेखा दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते.पिंपळगावला होणार फायर स्टेशनग्रामपंचायत विभागाने नागरी सुविधेच्या कामांचे नियोजन पूर्ण केले असून, यातील काही निधीतून पिंपळगाव बसवंत येथे अग्निशमन केंद्र उभारण्याचे सूतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. त्यासाठी निधी पुरेसा नसला तरी, जिल्हा  नियोजन समितीकडून अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदPoliticsराजकारण