शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक जाळ्यांचा फास सुटला झाडे सुरक्षित : पालिक प्रशासनाला आली जाग

By admin | Updated: April 17, 2017 00:38 IST

पालिका प्रशासनाला आली जाग

  नाशिक : गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकापासून तर थेट शहीद सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये वाढलेल्या झाडांच्या बुंध्यांभोवती संरक्षक जाळ्यांचा फास आवळला गेला होता. याबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून झाडांभोवतालच्या जाळ्या काढून घेण्यास सुरुवात झाली. गंगापूररोडवरील झाडांची वाढ झाल्याने या त्यांच्याभोवती असलेल्या संरक्षक जाळ्या बुंध्यामध्ये रूतत चालल्या होत्या. यामुळे झाडे असुरक्षित बनली होती तसेच संरक्षक जाळ्याही तुटून दुभाजकाबाहेर रस्त्यांमध्ये येत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला होता. रोपट्यांची दमदार वाढ होऊन वृक्षांमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी वृक्ष संरक्षक जाळ्या लावल्या जातात; मात्र जेव्हा रोपट्यांचे झाड होते तेव्हा या जाळ्यांचे संरक्षण काढून घेणे गरजेचे असताना पालिके च्या उद्यान विभागाच्या उदासीनतेमुळे गंगापूररोडवरील झाडांचे बुंधे जखमी होत होते. दुभाजकांमध्ये बूच, बकाम यांसारख्या प्रजातीची झाडे चांगली वाढली आहेत. या झाडांमुळे या रस्त्याला हिरवाईचे कोंदण प्राप्त झाले असून, या सौंदर्याला पालिकेच्या उद्यान विभागाच्या निष्काळजीपणामुळे बाधा पोहचत होती. उद्यान विभागाने संरक्षक जाळ्या काढून घेण्याची मागणी निसर्गप्रेमी रहिवाशांकडून केली जात होती.