शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रपोज डे’लाच प्रियकराने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:15 IST

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजसारथी सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) या युवकाने त्याचे प्रेम ...

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राजसारथी सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर राहणारा उच्चशिक्षित युवक अजय अनिल थोरात (२५) या युवकाने त्याचे प्रेम प्रेयसीकडे व्यक्त करत लग्नाची मागणी घातली; मात्र तिच्याकडून लग्नाला नकार मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून अजय याने आपल्या राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेत स्वत:चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ८) दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी किरण श्रावण गिरी याने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद प्रथमदर्शनी केली आहे.

अजय याचा रूम पार्टनर किरण हा कामानिमित्त घराबाहेर गेलेला असताना अजय याने तो येण्यापूर्वीच पंख्याला दोरी बांधून त्याअधारे गळफास घेत आपले जीवन संपविले. जेव्हा किरण हा दुपारी घरी आला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने दरवाजा ठोठावला तसेच अजयच्या मोबाइलवर वारंवार संपर्कही केला; मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी इमारतीमधील अन्य रहिवाशांनीही धाव घेत दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केले; मात्र दरवाजा उघडत नसल्याने रहिवाशांनी इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळेतच बिट मार्शल तेथे दाखल झाले व त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावले असता अजयने गळफास घेतल्याचे लक्षात आले. गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीत अजयला तिच्या मैत्रिणीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत. गुन्हा दाखल केला आहे.

--इन्फो--

अजय होता इंजिनिअर

अजय याने बॅचलर ऑफ टेक्नॉलोजीची पदवी घेतली असून, तो नाशिक येथील एका आरओ उपकरण विक्री करणाऱ्या कंपनीत नोकरी करत होता. मागील चार महिन्यांपासून अजय हा राजसारथी सोसायटीत त्याचा मित्र किरणसोबत भाडेतत्त्वावर राहत होता. तो मूळ अहमदनगरमधील पाथर्डी येथील होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचे कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहेत. अजयने टोकाचे पाऊल उचलून स्वत:चे जीवन संपविल्याने थोरात कुटुंबीयांसह त्याच्या मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजयच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, दाजी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात अहमदनगरच्या पाथर्डी या मूळ गावी त्याचा अंत्यविधी पार पडला.