शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’साठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:57 IST

राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील ३५ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट रस्ते विकास महामंडळाने तयार करून तो राज्य सरकारला पाठविला असून, त्याला मान्यता मिळताच, यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक : राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टÑपतींनी मान्यता दिल्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील ३५ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने तयार करून तो राज्य सरकारला पाठविला असून, त्याला मान्यता मिळताच, यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, यापूर्वी शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्यात पाचपट रक्कम व थेट खरेदीची तरतूद होती, आता मात्र फक्त चारपटच मोबदला मिळणार असल्याने शेतकºयांचे धाबे दणाणले आहे.  मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व सिन्नर या दोन तालुक्यांतून जाणार असून, त्यासाठी आजवर महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने सुमारे ६५ टक्के जागा शेतकºयांकडून थेट खरेदीने घेतली आहे. शेतकºयांना बाजारभावाच्या पाचपट रक्कम तसेच त्यांच्या शेतातील झाडे, पिके, विहिरी, बांधकाम याचे मूल्यांकन करून त्याची वेगळी रक्कम अदा  करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकºयांचा विरोध मावळून सहमतीने जमिनीची खरेदी देण्यात आली. परंतु अद्यापही ३५ टक्के जमीन ताब्यात आलेली नाही. जोपर्यंत ८० टक्के जमीन ताब्यात येत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात कायदेशीर अडचणी आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर सरकारने भूसंपादन कायदा २०१३ मध्ये बदल सुचवून राष्टÑपतींच्या मान्यतेने नवीन अधिसूचना काढली आहे. त्यामुळे आता समृद्धीसाठी जमीन देण्यास विरोध करणाºयांच्या जमिनी थेट भूसंपादन कायद्यानुसारच परंतु प्रसंगी सक्तीने संपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सक्तीच्या विरोधात शेतकºयांनी न्यायालयातही तक्र ार केल्यास बाधितांच्या नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा करून प्रकल्पाचे काम पूर्ण करणे यंत्रणेस शक्य होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी यासंदर्भात महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने नाशिक जिल्ह्णातील संपादित करावयाच्या क्षेत्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, त्यांची मान्यता मिळाल्यावर तातडीने त्यावर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग