शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

‘एचएएल’चाच विमानसेवेचा प्रस्ताव

By admin | Updated: April 18, 2017 01:45 IST

सुखद : नाशिक-हैदराबाद दरम्यान करणार प्रवासी वाहतूक

नाशिक : प्रादेशिक हवाई सेवा (रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस) माध्यमातून येत्या सप्टेंबरपासून नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. तत्पूर्वी एचएएलनेच तयार केलेल्या १९ सीटर विमानांच्या माध्यमातून नाशिक-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याचा एचएएलचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती एचएएलचे महाप्रबंधक बी. एच.वी. शेषागिरीराव यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिली.एचएएलचा मुख्यत्वे विमाने तयार करण्याचा उद्योग असून, विमानसेवा पुरविण्याबाबत कोठेही सुरुवात झालेली नाही. मात्र कानपूर येथील एचएएलमध्ये १९ सीटर दोन चार्टड विमाने तयार केली असून, त्यातून प्रामुख्याने प्रवासी वाहतूक करण्याबाबत एचएएलच्या विपणन विभागाने एचएएलच्या अध्यक्षांसोबत चर्चा झाली आहे. नाशिकला विमानतळ तयार असून, विमानसेवा सुरू करण्यासाठी निमा तसेच नाशिकच्या विविध संघटना प्रयत्नशील आहेत. त्यातूनच विमानसेवेबाबत सर्वेक्षण सुरू झाल्याचे शेषागिरीराव यांनी सांगितले. एचएएलची १९ सीटर चार्टड विमाने प्रथमत: भाडे कराराने देण्याचे प्रयोजन आहे. त्यातून पाच ते दहा टक्के जरी संबंधित विमान वाहतूक कंपनीने नफा दिला तरी एचएएलला तो पुरेसा आहे. जर कोणी तयारच झाले नाही, तर मात्र एचएएलनेच विमानसेवा देण्याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक - दिल्ली किंवा नाशिक-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याबाबत एचएएलला विचारणा केली. नाशिक-पुणे व नाशिक-मुंबई दरम्यान प्रादेशिक हवाई सेवे(रिजनल कनेक्टिव्हिटी सवर््िहस)च्या माध्यमातून एअर डेक्कनने विमानसेवा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे नाशिकहून दिल्लीला जाण्याची प्रथम पसंती फेसबुक सर्वेक्षणातून पुढे आल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी बी.एच. वी. शेषागिरीराव यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी बी.एच. वी. शेषागिरीराव यांनी नाशिकहून नागपूर तसेच हैदराबादपर्यंत या १९ सीटर विमानाने विमानसेवा देणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)तिरुपती बालाजीभक्तांची सोयनाशिकहून दरवर्षी तिरुपती (तिरुमल्ला) बालाजीला जाणाऱ्या नियमित भक्तांची संख्या मोठी असल्याने एचएएलने सुरुवातीला नाशिक-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करावा, असा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी मांडला. त्यावेळी एचएएलचे महाप्रबंधक बी.एच. वी. शेषागिरीराव यांनी वरिष्ठाशी बोेलून याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच एचएएलची ही दोन १९ सीटर विमाने नाशिकला दाखल होणार आहेत.