शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मिळाले दाखले

By admin | Updated: August 9, 2015 00:04 IST

कश्यपी धरण : पुनर्वसनासाठी प्रयत्नांना गती

नाशिक : नाशिककरांची वाढीव तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या मालकांना देण्यात आलेला प्रकल्पग्रस्ताचा दाखला अखेर त्यांच्या वारसांच्या नावावर करण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी देवरगाव येथे जाऊन दाखल्यांचे वाटप करतानाच पुनर्वसनाच्या अंगाने सुविधांची पाहणीही केली. कश्यपी धरणासाठी नाशिक तालुक्यातील देवरगाव, गोळशी, गोंडेगाव, खऱ्याची वाडी या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमिनींच्या मालकांना शासनाचा मोबदला देतानाच, प्रकल्पग्रस्ताचा दाखलाही त्यावेळी देण्यात आला; परंतु या दाखल्याच्या आधारे शासकीय नोकरीत असलेल्या आरक्षणाचा फारसा लाभ प्रकल्पग्रस्तांना होऊ शकला नाही. साधारणत: ४५ वयोगटापर्यंत हा दाखला वैध ठरत असल्याने जमीनमालकांनी सदरचा दाखला वारसांना हस्तांतरित करावा, या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा चालविला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले. या गोष्टींची दखल घेत जिल्हा पुनवर्सन अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड यांनी अशा प्रकल्पग्रस्तांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवून त्यावर कार्यवाही सुरू केली. मंगळवारी देवरगाव येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात येऊन त्यात काही प्रकल्पग्रस्तांना दाखले वितरित करण्यात आले. देवरगाव येथेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याने त्याठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही पाहणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार गणेश राठोड, नायब तहसीलदार आवारे, मंडल अधिकारी, तलाठी आदि अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)